उत्कृष्ट सामाजिक कार्याबद्दल दिव्यांग सेना राज्य पुरस्काराने महेश शिरसाठ यांना सन्मानित

चोपडा दि.१८: चोपडा तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार महेश पी. शिरसाठ यांना दिव्यांग सेनेचा दिव्यांग सेना महाराष्ट्र राज्य पुरस्काराने राष्ट्रीय अध्यक्ष प्रसाद साळवी यांच्या शुभहस्ते जिल्हाधिकारी कार्यालय अल्पबचत भवन सभागृहात आयोजित कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले आहे.
सामाजिक बांधिलकी जपत सामाजिक, शैक्षणिक, कलावंत, आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या व्यक्तींचा दिव्यांग सेना महाराष्ट्र राज्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते त्या अनुषंगाने श्री.महेश पी.शिरसाठ यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा यथोचित गौरव करण्यात आला आहे.
यावेळी व्यासपीठावर दिव्यांग सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रसाद साळवी, जितेंद्र कुवर ( जळगाव सं.गां.यो. तहसीलदार), भरत चौधरी (समाज कल्याण अधिकारी दिव्यांग विभाग), फारुख शेख मन्यार( बिरारी संस्था अध्यक्ष), भरत जाधव (राष्ट्रीय सचिव),गणेश पाटील (संघर्ष दिव्यांग बहुउद्देशीय संस्थापक अध्यक्ष), अक्षय महाजन (जिल्हाध्यक्ष), यमुनाताई नाशिक,जितेंद्र पाटील, राहुल कोल्हे, दिपाली कासार ,आदि मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय महाजन यांनी केले, आभार जितेंद्र पाटील यांनी मानले कार्यक्रम यशस्वीते साठी ज्ञानेश्वर पाटील, हितेश तायडे, प्रदीप चव्हाण, खेमराज कोळंबे, विशाल दांडगे यांनी मोलाचे सहकार्य केले.उपरोक्त पुरस्कार मिळाल्याबद्दल माजी आमदार प्रा चंद्रकांत अण्णासाहेब सोनवणे, आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे,संजय गांधी निराधार समिती सदस्य संजय शिरसाठ, माजी महापौर डॉ आश्वीन शांताराम सोनवणे, गर्जना जिल्हाध्यक्ष सुभाष सोनवणे, माजी नगराध्यक्ष चत्रभूज आंबा सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते रवि ठाकरे, जळगाव नगरसेवक किशोर बाविस्कर, सामाजिक कार्यकर्ते आबा उर्फ मुकेश बाविस्कर, ग.स.शाखाधिकारी जगन्नाथ बापू बाविस्कर,माजी पं.स.भापती गोपाळराव सोनवणे, माजी बांधकाम सभापती अॅड धर्मेंद्र सोनार, माजी नगराध्यक्ष जीवनभाऊ चौधरी, नगरसेवक प्रकाश राजपूत, संदीप सावळेसर, यशवंत जडे, कॉंगसचे शहराध्यक्ष के.डी.चौधरीसर, सेना माजी शहराध्यक्ष महेंद्र भोई, कैलास शिरसाठ, चोसाका माजी संचालक साहेबराव शिरसाठ आदिंची अभिनंदन केले आहे.
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



