गोविंदा आला रे आलाच्या जल्लोषात बालगोपालांची दहीहंडी साजरी

पाचोरा, दि 19– पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री.सु.भा.पाटील प्राथमिक विद्यामंदिर पाचोरा येथे आज श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्ताने बाल दहीहंडीचा कार्यक्रम घेण्यात आला. बालगोपाळांचे तीन थर लावून सलामी देण्यात आली .शाळेचे मुख्याध्यापक श्री.अशोक परदेशी सर यांच्या हस्ते दहीहंडीचे पूजन करण्यात आले. बालगोपालाच्या मोठया जल्लोषाने दहीहंडी कार्यक्रम घेण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांनी राधाकृष्ण यांच्या वेशभूषा करून गरबा-दांडिया ,ढोल-ताशांच्या गजरात नृत्य केले. प्रसंगी मोठ्या संख्येने पालक वर्ग उपस्थित होता. त्यांनी दहीहंडीचा आनंद घेतला. त्याचबरोबर बालगोपाळांना कृष्ण जन्माष्टमी चा प्रसादाचे वाटप करण्यात आले. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377



