किरीट सोमैया ठाकरेंच्या कोर्लई अलिबाग येथील 19 बंगल्यांच्या बाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार

“मुख्यमंत्री मा.उद्धव ठाकरेंच्या कोर्लई अलिबाग येथील 19 बंगल्यांच्या घोटाळ्याच्या” जनहित याचिके संदर्भात आज अलिबाग येथे अॅड किरण कोसमकर, अॅड अंकित बंगेरा सह १२ वकिलांशी चर्चा केली पुढिल 10 दिवसांत याचिकेचे काम पूर्ण होऊन मे महिन्यात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे किरीट सोमैया यांनी सांगितले
श्रीमती रश्मी उद्धव ठाकरेंनी अन्वय नाईकांकडुन कोर्लई येथे 9.5 एकर जमिन 19 बंगल्यांसह विकत घेतली.अन्वय नाईक आणि ठाकरे कुटुंबीय या रु.5.42 कोटी किंमत असलेल्या 19 बंगल्यांसाठी 1 एप्रिल 2009 ते 31 मार्च 2021 पर्यंत कर भरत होते/ कर भरला. पण इन्कम टॅक्स रिटर्न्स मध्ये हे बंगले दाखवले गेले नाही आणि आता ठाकरे म्हणत आहेत की बंगले गायब झालेत अशी माहीती त्यांनी दिली
अॅड किरण कोसमकर, अॅड अंकित बंगेरा, सुहास करूळकर, अमित देशमुख, श्रीविष्णू शशी धरण, मिलिंद साळवकर,अर्जुन, अॅड हीना तांडेल, निखिल चव्हाण, अॅड दीपक, अॅड श्रीराम ठोसर, अॅड किशोरी आग्रे, अॅड वैशाली शेवटे, अॅड. अभिषेक सावंत हे यावेळी उपस्थित होते.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377



