
जळगाव, दि. 29 : मातोश्री मुलींचे शासकीय वसतिगृह, सरस्वती नगर, धात्रक फाटा, पंचवटी, नाशिक येथे छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथी, पुणे यांचेमार्फत मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा गटातील 75 मुलींसाठी व महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती, नागपुर यांचेमार्फत इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गच्या गटातील 75 मुलींसाठी तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील 50 मुलींसाठी अशाप्रकारे एकूण 200 मुलींसाठी वसतिगृह सुरू करण्यात येत आहे.
सारथी, महाज्योती संस्था व उच्च व तंत्र शिक्षण यांच्या आवश्यक निकष, अटी व शर्ती पुढील संकेतस्थळावर उपलब्ध आहे., सारथी विभागीय कार्यालय, पत्ता- बँरेक नंबर- विभागीय आयुक्त कार्यालय आवार, नाशिकरोड, नाशिक -422101., संपर्क फोन नं.-0253-2993689 ईमेल- sarthinashik@gmail.com संकेतस्थळ https://sarhi-maharashtragov.in महाज्योती विभागीय कार्यालय पत्ता- डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, समाज कल्याण कार्यालय, नाशिक-पुणे रोड, नाशिक -422011, संपर्क फोन नं.- 8087576393 ईमेल- maliajyotinsk@gmail.com संकेतस्थळ- https://mahajyoti.org.in याप्रमाणे आहे.
सारथी व महाज्योतीचे संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज भरण्यास 30 जून, 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून अर्ज ऑनलाईन भरल्यानंतर त्याची प्रिंट काढून व त्यासोबत आवश्यक कागदपत्रे स्वसाक्षांकित करून पोस्टाद्वारे/प्रत्यक्ष सारथी संस्थेचे नाशिक येथील वरील पत्याातवर 30 जून, 2023 पर्यंत सादर करावेत.
वसतिगृहाचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थिनींनी शासनाच्या इतर वसतिगृहाच्या योजनेचा लाभ घेतलेला नसावा, वसतिगृहात प्रवेश देण्यात येणाऱ्या पात्र मुलींची यादी सबंधित सारथी/महाज्योती/उच्च व तंत्र शिक्षणविभाग यांनी कागदपत्रांची पडताळणी करुन अंतिम केल्यानंतर सारथीचे संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल, पात्र विद्यार्थिनींना वसतिगृहात प्रत्यक्ष दाखल (हजर) होण्याचा दिनांक स्वतंत्रपणे कळविण्यात येईल. असे सीमा अहिरे, उपव्यवस्थापकीय संचालक, सारथी तथा उपजिल्हाधिकारी (भूसंपादन क्र.2) नाशिक यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



