आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
महाराष्ट्र
Trending

सेवा, संवेदना आणि विकासाचा संकल्प-पाचोर्‍यात भाजपाची सेवा पंधरवडा नियोजन कार्यशाळा उत्साहात संपन्न…!

पाचोरा :– “सर्वांची साथ, सर्वांचा विकास” या मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या ध्येयवाक्याचा मंत्र हाती घेऊन भारतीय जनता पक्षाने समाजकल्याणासाठी हाती घेतलेल्या सेवा पंधरवडा अभियानाच्या नियोजन कार्यशाळेचे आयोजन पाचोरा येथे उत्साहात संपन्न झाले. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील भाजपा मध्यवर्ती संपर्क कार्यालयात पार पडलेल्या या कार्यशाळेला जळगाव जिल्ह्याचे पश्चिम जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी अध्यक्षस्थानी होते.
गेल्या अकरा वर्षांपासून देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशभरात सेवाभाव व सर्वसमावेशक विकासाचे जे कार्य अविरत सुरू आहे, त्यातून प्रेरणा घेत राज्यात मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सेवा पंधरवडा अभियानाला गती देण्यात येत आहे.मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबरपासून ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती २ ऑक्टोबरपर्यंत सेवा पंधरवडा २०२५ विविध लोककल्याणकारी उपक्रमांद्वारे साजरा केला जाणार आहे.

समाजाच्या सर्व घटकांपर्यंत सेवा, संवेदना व विकास पोहोचविण्याचा हा प्रामाणिक संकल्प असल्याचा ठाम संदेश या कार्यशाळेत देण्यात आला. या कार्यशाळेत अनेक कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेशही झाला.

यावेळी अमोल नाना पाटील (जिल्हा सरचिटणीस), मधुकर भाऊ काटे (जिल्हा उपाध्यक्ष), सुभाष भाऊ पाटील (जिल्हा उपाध्यक्ष), मा. वैशालीताई सुर्यवंशी, अमोल भाऊ शिंदे (माजी तालुकाप्रमुख),डी. एम. भाऊसाहेब (माजी जिल्हा परिषद सदस्य),संजय नाना वाघ, गोविंद शेलार (नगरदेवळा मंडळ तालुकाप्रमुख), शोभाताई तेली (पिंपळगाव मंडळ तालुका अध्यक्ष), दीपक माने (पाचोरा शहर मंडळ तालुकाध्यक्ष) आदी मान्यवर उपस्थित होते.

तसेच रमेश भाऊ वाणी, प्रदीप पाटील, बन्सीलाल पाटील, कांतीलाल जैन, नंदू भाऊ सोमवंशी, संदीप जैन, सिकंदर तडवी, पंढरी पाटील, दत्ता बोरसे, प्रमोद नाना पाटील, शिवदास पाटील, मिथुन वाघ, राहुल पाटील, मुकेश पाटील, अनिल आबा पाटील, भगवान भाऊ मिस्तरी, उमेश माळी, सतीश देशमुख, सलीम नईम शेख, लकी पाटील, सुनील मोरे, सुनील नवगिरे, ज्योती चौधरी, कुंदन पांड्या, लक्ष्मी पाटील, सरला पाटील,सविता शेळके, चेतना हिरे आदी महिला कार्यकर्त्यांसह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377

बातमी लाईक  करा,शेअर करा

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!