
पाचोरा:- दिनांक 12 /9 /2025 शुक्रवार रोजी श्री. गो.से.हायस्कूल.पाचोरा. येथे “दंत आरोग्य” मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. पाचोरा येथील प्रसिद्ध “आस्था क्लिनिक”चे दंतवैद्य डॉ.आनंद जैन. व त्यांच्या समवेत डॉ.नम्रता जैन.व सहकारी दंत वैद्य यांचे दंत मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले. लहान वयापासून विद्यार्थ्यांनी आपल्या दातांचं आरोग्य कसे राखावे, काय काळजी घ्यावी, ब्रश कसा करावा या संदर्भात अनमोल असे मार्गदर्शन डॉ.आनंद जैन व त्यांच्या सहकारी टीमने केले. विद्यार्थ्यांनी याप्रसंगी डॉक्टरांना आपल्या मनातील विविध शंका व प्रश्न विचारले.विद्यार्थ्यांनी विचारलेल्या सर्व शंका व प्रश्नांची उत्तरं व उपाय डॉ.आनंद जैन.यांनी दिले. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये दातांच्या आरोग्य विषयी जागरूकता व घ्यावयाची काळजी याचे सखोल मार्गदर्शन मिळाले.

यावेळी मंचावर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. एन.आर.पाटील, उपमुख्याध्यापक श्री.आर.एल. पाटील, किमान कौशल्य विभाग प्रमुख श्री.मनीष बाविस्कर. तसेच पर्यवेक्षिका सौ.अंजली गोहिल मॅडम,श्री.आर.बी.तडवी, श्री.आर.बी.बांठिया, ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती एस.एस.पाटील. मॅडम, ज्येष्ठ क्रीडा शिक्षक श्री.एस.पी.करंदे उपस्थित होते.
“दंत-आरोग्य मार्गदर्शन शिबिर” या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.आर.बी.बोरसे.व आभार प्रदर्शन श्री.रुपेश पाटील.यांनी केले.
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



