पाचोऱ्यात समता सैनिक दलातर्फे प्रांत कार्यालयावर धिक्कार मोर्चा संपन्न !

पाचोरा – पाचोरा व भडगांव तालुक्यातील सामाजिक हिताच्या प्रलंबित मागण्यासाठी समता सैनिक दलाने राज्य अध्यक्ष मा.नानासाहेब बागुल यांच्या मार्गदर्शना नुसार निषेध व धिक्कार मोर्चाचे ८ सप्टेबर रोजी करण्यात आले होते. पाचोरा शहरातील जारगाव चौफुली ते – प्रांताधिकारी कार्यालया पर्यंत समता – सैनिक दलाचे जिल्हाध्यक्ष किशोर – डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा हा निघाला. मोर्चामध्ये प्रलंबित मागण्या पुर्ण व्हाव्यात. म्हणून शहरवासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेंदुर्णी ता. जामनेर येथे डॅा.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची एका समाज कंटकाने विटंबना केली असून या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा, संविधान का बदलावे या पुस्तकाचे लेखक ऍड. शिवाजी कोकणे याच्यावर तात्काळ देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा व सदरील पुस्तकावर तात्काळ बंदी घालण्यात यावी, पाचोरा – भडगाव तालुक्यात व वाणेगाव ता. पाचोरा येथील बौध्द, मातंग व चर्मकार बांधवासाठी असलेली स्मशानभूमीची जागेवरील तत्काळ अतिक्रमण काढत तार कंपाऊंड करून सदर समाज बांधवांच्या ताब्यात देण्यात यावी.
महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेल्या भिल्ल, नवबौध्द, रमाई घरकुल, प्रधानमंत्री आवास योजना या सर्व समाज बांधवाच्या घरकुल योजने अंतर्गत जे लाभार्थी असतील त्यांना तत्काळ घरकुल योजनेचा लाभ मिळावा,तसेच कजगाव पिंप्री येथिल डॅा.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळाचा परीसर सुशोभीत करत नवीन पुतळा बसविण्यात यावा.गिरड ता.भडगांव येथित समाज बांधवाच्या मागणी प्रमाणे सार्वजनिक उपक्रम राबविण्यासाठी जागा व जागेवर ओटा बाधून द्यावे अंजनविहीरे ता.भडगाव येथील शेतकरी आयु. ईश्वर सोनवणे यांची जमीन नावे लावण्यात यावी. पाचोरा येथिल 1 कोटी 22 लाखाच्या शेतकरी अनुदान संदर्भातील भष्ट्राचाराची सि.बी.आय.चैकशी व्हावी. तालुक्यातील शासन दरबारी म्हणजेच तहसिल कार्यालय, प्रांताधिकारी कार्यालय,पंचायत समिती,ग्रामपंचायत येथे गोर गरीबांच्या प्रलबिंत मागण्या त्वरीत व तात्काळ सोडवण्यात याव्यात.वरील अशा न्यायिक मागण्यासाठी आंदोलनाचे शिस्त बध्द नियोजन पाचोरा व भडगाव शाखेच्या वतीने करण्यात आले. व वरील मागण्या 30 सप्टेबर पर्यंत पूर्ण न झाल्यास कायदा व सुव्यवस्थेचा मान राखत सर्व समाज व तालुक्यातील जनतेला सोबत घेऊन जन आंदोलन छेडले जाईल.असे निवेदन प्रांताधिकारी भुषण अहिरे यांना समता सैनिक दलातर्फे देण्यात आले.
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



