
जळगाव- जिल्हयात दिनांक 08/06/2023 रोजी सायंकाळी प्राप्त झालेल्या माहितीवरुन गिरणा नदीपात्रातून वाळूचे अवैध उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी अपर जिल्हाधिकारी जळगाव यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकारी जळगाव भाग जळगाव, जिल्हा खनिकर्म अधिकारी, महसूल व पोलीस विभागाच्या चमू यांनी मौजे खेडी खु. ता.जळगाव येथील गिरणा नदीपात्रास भेट देवून पाहणी केली असता गिरणा नदीतून अवैध उत्खनन करुन नदीकाठावर अंदाजे 200 ब्रास वाळूचा साठा विखुरलेल्या स्वरुपात आढळून आल्यामुळे तो जप्त करण्यात आलेला असून सदर वाळूसाठा प्रशासकीय इमारतीचे आवार, जळगाव येथे जमा करण्यात आलेला आहे. तसेच 15 दिवसांपूर्वीही अशाच प्रकारे बांभोरी येथील गिरणा नदीकाठावरील झुडपांमध्ये लपविलेला अंदाजे 40 ब्रास वाळूचासाठा जप्त करण्यात आलेला आहे. शासनाच्या निर्देशानुसार सदर जप्त केलेल्या वाळूसाठयाची निर्गती करण्यात येणार आहे.
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



