जळगाव जिल्ह्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी’गृह मतदान सुविधा’ उपलब्ध करून दिली जात आहे.
जळगाव – मतदान प्रक्रियेत वृद्धावर अन्याय अशा आशयाची प्रश्नार्थक चिन्ह देऊन बातमी फिरत आहे. सदर बातमीत कोणतेही तथ्य नाही. सध्या भारत निवडणूक आयोगाने 85 वर्षे वया पेक्षा अधिकच्या मतदारांना व दिव्यांग मतदारांना गृह मतदान सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
सध्या जळगाव जिल्ह्यात ही प्रक्रिया सुरु आहे. एक मतदार असला तरी तिथे तात्पुरते मतदान केंद्र उभारून तिथे पोलीस बंदोबस्त ठेवला जातो. इथेही पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. निवडणूक प्रक्रियेतील अधिकारी व सूक्ष्म निरीक्षक पण उपस्थित होते. ज्येष्ठ मतदाराला टपाली मतपत्रिकेवर कसे मतदान करावे हे समजावून सांगितले होते. निवडणूक प्रक्रियेची गोपनीयता राखण्यात आली होती.तिथे कोणीही कोणाला धमकवलेले नाही. सर्व प्रक्रियेचे व्हिडियो चित्रीकरण देखील करण्यात आले आहे.त्यामुळे सदर बातमी चुकीची आहे हे जिल्हा निवडणूक विभागाकडून स्पष्टीकरणासह देत आहोत. जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनीही याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. कृपया अशा बातम्या व्हायरल करून जनमाणसात चुकीचा संदेश देऊ नये अशी माध्यमाला जिल्हा निवडणूक प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377