जळगाव जिल्ह्यातील महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी दिला नारा “तारीख तेरा, मतदान मेरा”

जळगाव दि.9 – जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांच्या संकल्पनेतून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव च्या राष्ट्रीय सेवा योजना कक्षाच्या अंतर्गत येणाऱ्या जवळपास 75 महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांनी “तारीख तेरा,मतदान मेरा” हे घोषवाक्य म्हणून मतदार जनजागृतीचा कार्यक्रम एकाच वेळी घेतला. त्यामुळे महाविद्यालयाचे कॅम्पस मध्ये चैतन्य पसरले.
दिनांक ८ मे २०२४ रोजी दुपारी १२.३० वाजता जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि जिल्हा निवडणूक स्वीप नोडल अधिकारी तथा जिल्ह्याचे समाजकल्याण सहायक आयुक्त योगेश पाटील यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील महाविद्यालयाच्या प्राचार्यांची ऑनलाइन बैठक घेवून आयोजन करण्याचे आवाहन केले होते. त्याअनुषंगाने आज 9 मे रोजी “तारीख तेरा, मतदान मेरा” या कार्यक्रमाचे आयोजन करुन सर्वांना युवा शक्ती ला मतदान प्रक्रियेत जास्तीत जास्त सहभागी करण्यासाठी प्रोत्साहीत करावे हा मानस आजच्या कार्यक्रमातुन सफल झाला.
आजच्या कार्यक्रमात विद्यापीठाचे कुलसचिवविनोद पाटील साहेब, रासेयो प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांना मतदानाची शपथ दिली. राष्ट्रीय सेवा योजना संचालक प्रा. डॉ. सचिन नांद्रे यांनी “तारीख तेरा मतदान मेरा” हे घोषवाक्य म्हणून युवा मतदारांमध्ये चैतन्य निर्माण केले. कार्यक्रमास डॉ. संजय पाटील,विभागीय समन्वयक प्रा योगेश पुरी डॉ. गोपाल निंबाळकर डॉ. बिजवस्नी, आणि विद्यार्थी उपस्थित होते.
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



