महाविकास आघाडीला जोरदार धक्का ? ना अनिल दादा पाटील यांची यशस्वी शिष्टाई.उद्या राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा

पाचोरा, दी ८ – आज लोकसभा प्रचारासाठी पाचोरा शहरात आलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप वाघ आणि बंधू यांच्याशी बंद द्वार गुप्त वार्तालाप झाला असून या चर्चेनंतर उद्या राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा तातडीने सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आला आहे.माजी आमदार दिलीप वाघ यांच्या निवासस्थानी झालेल्या गुप्त बैठकीला राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री पाटील नामदार अनिल पाटील ,आमदार किशोर आप्पा पाटील ,आमदार मंगेश दादा चव्हाण महायुतीच्या उमेदवार श्रीमती स्मिताताई वाघ यांच्या उपस्थितीत ही विशेष बैठक पार पडली.
या भेटीनंतर पाचोरा तालुका व जळगाव लोकसभा मतदारसंघात चर्चेला उधाण आले असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सक्रिय सहभागामुळे महायुतीला अधिकचे बळ मिळणार यात काही शंका नाही.
उबाठाचे उमेदवार श्री.करण पवार यांची सुरवातीला प्रचारात असलेली आघाडी ही उल्लेखनीय होती परंतु जसे जसे मतदाप्रक्रिया जवळ येत आहे त्यानुसार महायुतीचे पारडे जड होत आहे शिवाय मविआ मधील मित्र पक्षा मधील काही नेते नाराज असल्याची चर्चा यामुळे याचाही संदर्भ येथे देणे गरजेचे वाटते. पाचोरा – भडगाव तालुक्यांतील मा.आ. दिलिपभाऊ वाघ परिवाराचे असलेले मतदान हे खूप मोठे असल्याने निर्णायक भूमिका बजावणार होते परंतु संकटमोचक ना. गिरिशभाऊ महाजन,ना. अनिल पाटील ,आ.किशोरआप्पा पाटील यांनी उपमूख्यमंत्री फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली ही खेळी नक्कीच महायुतीला लाभदायक ठरणार हे मात्र निश्चित मानले जात आहे.
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



