पाचोरा -भडगाव कृषि उत्पन्न बाजार समिती तर्फे शेतकऱ्यांसाठी ०१ जुलै पासून एक रुपयात पिक विमा भरण्याची सुविधा निशुल्क सुरु – सभापती गणेश भिमराव पाटील

पाचोरा – नवीन खरीप हंगाम सुरु झालेला असून संभाव्य नैसर्गिक आपत्तीचे धोके पाहता शेतकऱ्यांनी कृषि मालाचा पिक विमा उतरवणे गरजेचे आहे. सद्यस्थितीत शासनाची कृषि पिकांसाठी एक रुपयात पिक विमा योजना सुरु झालेली आहे. सदर योजनेमार्फत शेतकऱ्यांना पिक विमा उतरवणे सुलभ व्हावे यासाठी माननीय आमदार “श्री किशोर आप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार” कृषि उत्पन्न बाजार समिती,पाचोरा-भडगाव तर्फे मुख्य कार्यालय पाचोरा येथे सन २०२४- २५ चा खरीप हंगामातील पिकांसाठी पिक विमा भरणा सुविधा केंद्र निशुल्क दरात मागील वर्षी प्रमाणे या वर्षी हि बाजार समिती मार्फत १ जुलै-२०२४ पासून सुरु करण्यात येणार आहेत. पिक विमा भरण्यासाठी अंतिम मुदत १५ जुलै-२०२४ पर्यंत आहे. पिक विमा भरण्यासाठी पिक पेरा असलेला ७/१२ उतारा, ८ अ उतारा, आधार कार्ड, बँक पास बुक झेरॉक्स, स्वयंम घोषणा पत्र या कागदपत्रांची आवश्यकता आहे. तरी कार्यक्षेत्रातील शेतकरी बांधवांनी सदर योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन बाजार समितीच्या वतीने सभापती श्री गणेश भिमराव पाटील व उपसभापती श्री. प्रकाश अमृत पाटील, श्री. प्रकाश शिवराम तांबे, श्री. युसुफ भिकन पटेल, श्री सुनिल युवराज पाटील, श्री. लखीचंद प्रकाश पाटील, श्री. राहुल रामराव पाटील, श्री. शामकांत अशोक पाटील, श्री. विजय कडू पाटील, श्री. राहुल अशोक संघवी या संचालकांनी केले आहे.
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



