शहीद जवानांचे त्या प्रत्येक गावात स्मारक बांधण्याची मागणी -आमदार किशोर पाटील.
भडगाव ता.26: शहीद जवानांचे त्या प्रत्येक गावात स्मारक बांधण्याची मागणी आमदार किशोर पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केली. यावर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत त्यासाठी ‘डीपीडीसी’ तुन निधी देण्याचे घोषणा केली.
काल (ता.25).ला जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात आमदार किशोर पाटील यांनी सांगीतले की, देशासाठी शहीद झालेल्या जवानांच्या गावात अंत्यसंस्कारासाठी लोकप्रतिनिधीं गेल्यावर त्याच्यांकडे त्या जवानाचे स्मारक करण्याची मागणी करण्यात येते. देशासाठी शहीद झालेल्या जवानाप्रती कृतज्ञता म्हणुन ते करणे आवश्यक बाब आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन मंडळातून निधी देण्याची मागणी त्यांनी केली. यावर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत त्यासाठी ‘डीपीडीसी’ तुन निधी देण्याचे जाहीर केले. या निर्णयाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.प्रतिक्रीयाजे जवान देशासाठी आपल्या प्राणाचे बलिदान देतात. ते शहीद झाल्यावर त्यांची आठवण म्हणून गावात शहिद जवानावर स्मारक होणे आवश्यक आहे. तीच मागणी मी डीपीडीसी त केली. पालकमंत्री यांनी ही सकारात्मक प्रतिसाद दिला. असे आमदार किशोर पाटील यांनी सांगितले.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377