“मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना”;4 लाभार्थ्यांना पालकमंत्री यांच्या हस्ते दिले कार्य प्रशिक्षण आदेश
जळगाव दि.8 – “जिल्हयात मुख्यमंत्री यांच्या नियोजित दौऱ्याच्या अनुषंगाने पालकमंत्री गुलाबराव पाटील, यांची पत्रकार परिषद झाली. त्यापूर्वी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत 4 लाभार्थ्यांना पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि आ. चिमणराव पाटील यांच्या हस्ते कार्य प्रशिक्षण आदेश देण्यात आले.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण कार्य निवड झालेले उमेदवार खालील आस्थापनांवर रुजू झालेले आहेत. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यांचे कार्यालय, जळगाव, सहाय्यक आयुक्त, जिल्हा समाजकल्याण कार्यालय, जळगाव, मौलाना आझाद, अल्पसंख्यांक महामंडळ, जळगाव या कार्यालयांचा समावेश आहे.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत अधिकाधिक शासकीय व खाजगी आस्थापना /महामंडळे/
उद्योजक यांनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव या कार्यालयाशी समन्वय साधून मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा व योजना यशस्वी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी यावेळी केले.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377