आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
महाराष्ट्र

पाचोरा वाणी युवा मंच शाखा तर्फे विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम संपन्न

पाचोरा - महाराष्ट्र वाणी युवा मंच शाखा पाचोरा तर्फे दि.25 ऑगस्ट रविवार रोजी महालपुरे मंगल कार्यालय येथे गुणवंत ज्ञानवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी आदर्श शिक्षक मा.श्री.यादवराव विठ्ठल सिनकर हे होते.प्रमुख अतिथी मा.श्री.योगेश वसंत येवले (संस्कार वाणी,पाचोरा चे प्रमुख) हे होते. सुरुवातीला प्रमुख अतिथींनी सरस्वती मातेच्या मूर्तीचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर प्रमुख अतिथींचा सत्कार श्री.योगेश रमेश शेंडे सर, श्री.महेंद्र महालपुरे,श्री.विवेक ब्राह्मणकार आणि म.वा.युवा मंच कार्यकर्त्यांनी केला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.योगेश शेंडे सर यांनी केले.श्री.डी.आर.कोतकर सर यांनी म.वा.युवा मंच च्या स्थापनेपासून ते आतापर्यंत राबविलेल्या वेगवेगळ्या स्तुत्य उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. सदर कार्यक्रमात श्री.शरद पाटे (माजी उपनगराध्यक्ष पाचोरा) यांनी आपल्या भाषणातून एकत्र कुटुंब पद्धतीतील फायदे सांगितले तसेच या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी आपले करिअर घडवताना अभ्यासासोबतच आपल्यात कौशल्य असणे हे सुद्धा महत्त्वाचे आहे.असेही त्यांनी आपल्या भाषणातून सांगितले. त्यानंतर मा.श्री.योगेशदादा येवले यांनी सांगितले की समाजातील लोक खेड्यातून शहराकडे, शहरातून मुंबई-पुण्याकडे आणि मुंबई पुण्यातील लोक परदेशात स्थलांतरित होत आहेत याबाबत चिंता व्यक्त केली. पण शहरात 10×10 च्या रूम मध्ये राहण्यात आनंद मानणारी आत्ताची तरुण पिढी अनेक समस्यांना सामोरे जात आहे.असेही ते शेवटी आपल्या भाषणातून म्हणाले. प्रा.श्री राजेंद्र चिंचोले लिखित करिअर सारथी या पुस्तकाचे वाटप श्री.योगेश दादा येवले यांनी पदवी आणि त्यापुढील शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या वडिलांच्या (कै.वसंत सदाशिव येवले) स्मरणार्थ मोफत दिले. प्रा.श्री.राजेंद्र चिंचोले सर यांनी विद्यार्थ्यांना व उपस्थितांना वेगवेगळ्या यशस्वी लोकांचे उदाहरणे देऊन करिअर संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.तसेच प्रा.श्री.राजेंद्र चिंचोले सर यांनी देखील त्यांच्या वडिलांच्या (कै.जनार्धन आनंदा चिंचोले) स्मरणार्थ करिअर सारथी हे पुस्तक 10 वी ,12 वी तसेच स्कॉलरशिप, नवोदय, ड्रॉईंग आणि इतर शालेय स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांना मोफत दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.अशोक आप्पा बागड, श्री.रमेश महालपुरे सर व प्रा.लक्ष्मण सिनकर सर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री.विजय जगन्नाथ सोनजे,श्री.संदीप महालपुरे,श्री.प्रवीण शेंडे, श्री.गणेश सिनकर, श्री.किरण अमृतकर, श्री.संजूभाऊ वाणी श्री.विशाल ब्राह्मणकर श्री.प्रकाश येवले इत्यादी जणांनी अथक परिश्रम घेतले तसेच कु.आरोही रमेश महालपुरे व कु.मनवा गणेश सिनकर या दोन चिमुकलींनी सुद्धा खूप खूप सहकार्य केले. शेवटी या छोट्या परी कार्यक्रमाचे आकर्षण ठरल्या. त्यांचे सर्व समाज बांधवांनी मनापासून कौतुक केले. कार्यक्रमास पूर्णवेळ उपस्थित राहणाऱ्या समाज बंधू-भगिनींना लकी ड्रॉ द्वारे 6 बक्षिसे श्री.व सौ.महेंद्र महालपुरे तसेच श्री.व सौ.योगेश शेंडे सर यांच्याकडून देण्यात आली. शेवटी अध्यक्षीय भाषणात आदरणीय श्री.यादवराव विठ्ठल सिनकर (आदर्श शिक्षक) यांनी अतिशय मौलिक व महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.आभार प्रदर्शनाचे काम श्री.विवेक ब्राम्हणकर यांनी केले. त्यानंतर सर्वांसोबतच स्नेहभोजनाचा कार्यक्रम संपन्न झाला

बातमी लाईक  करा,शेअर करा

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: CALL ME 8411009377 \\\\