शोध महाराष्ट्र रत्नांचा; नव्या महाराष्ट्राचा !
मुंबई– महाराष्ट्रातील युवकांमधील कौशल्याचा शोध घेण्यासाठी मुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेबांनी १ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या “शोध महाराष्ट्र रत्नांचा” या स्पर्धेच्या शुभारंभाची घोषणा केली आहे. महाराष्ट्र हा त्याच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीसाठी, कलागुणांसाठी ओळखला जातो. महाराष्ट्रातील युवकांना आपल्यातील नवीन कलागुणांना ओळखून त्यांचे कौशल्य राज्यस्तरीय व्यासपीठावर प्रदर्शित करण्याची संधी “शोध महाराष्ट्र रत्नांचा; नव्या महाराष्ट्राचा” या स्पर्धेतून मिळणार आहे. या स्पर्धेचा उद्देश विद्यार्थ्यांना त्यांच्यातील लपलेल्या प्रतिभेचा शोध घेऊन त्यांच्या अंतर्गत क्षमता ओळखण्यास मदत करणे हा आहे.
याच पार्श्ववभूमीवर मुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब, मा. पूर्वेश सरनाईक आणि खासदार श्री. डॉ. श्रीकांत शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या घरोघरी शिवसेना पक्षाचा आवाज, उपक्रम तसेच विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची माहिती मिळावी. या उद्देशाने शिवसेनेचे सोशल मीडिया राज्यप्रमुख मा.श्री. राहुल कनाल यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या ‘शिवसेना social आवाज’ आवाज कुणाचा… शिवसेनेचा ! या चिन्हाचे अनावरण आज मुख्यमंत्री महोदयांच्या शुभहस्ते करण्यात आले.
१ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या “शोध महाराष्ट्र रत्नांचा” या स्पर्धेच्या शुभारंभाची घोषणा मुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांनी केली. याप्रसंगी शिवसेना पक्षाचे मुख्य नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.या स्पर्धांचा तपशील पुढीलप्रमाणे – महाराष्ट्राचा सुखकर्ता (राज्यस्तरीय गणपती सजावट स्पर्धा) – रील टू रियल महाराष्ट्र (राज्यस्तरीय रील मेकिंग स्पर्धा)जळगाव जिल्ह्यातील सर्व इच्छुक स्पर्धकांनी मोठ्या संख्येने स्पर्धांमध्ये आपला सहभाग नोंदवून बाप्पाच्या स्वागतासाठी सज्ज होऊया !या दोन अप्रतिम स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी सज्ज व्हा !
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377