साई इंग्लिश अकॅडमितर्फे पुस्तक व लेखक ओळख स्पर्धा उपक्रम राबविणार-भैय्यासाहेब मगर
अंमळनेर – येथील साई इंग्लिश अकॅडमितर्फे विद्यार्थ्यांसाठी पुस्तक व लेखक ओळख स्पर्धेचे आयोजन करण्याचे निश्चित केले आहे.शासनाने अमळनेरला पुस्तकांचे गाव म्हणून नुकतेच घोषित केले आहे,त्यातूनच साई इंग्लिश अकॅडमिचे संचालक भैय्यासाहेब मगर यांना सदर कल्पना सुचली आहे, त्यातून विद्यार्थ्यांना पुस्तकांची व लेखकांची ओळख होणार आहे, त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.विद्यार्थ्यांना 50 निवडक पुस्तकांची व लेखकांची यादी द्यायची आणि त्यावर ही स्पर्धा घ्यायची.त्यानिमित्ताने विद्यार्थ्यांना पुस्तकांची व त्यांच्या लेखकांची नावे कळतील व भविष्यात विद्यार्थी ते पुस्तके वाचतील अशी अपेक्षा स्पर्धेचे आयोजक भैय्यासाहेब मगर यांनी केली आहे, लवकरच या स्पर्धा घेण्यात येणार आहेत, वाचन संस्कृती जोपासण्यासाठी सदर उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377