पाचोरा बाजार समितीची सर्वसाधारण सभा,भव्य शेतकरी मेळाव्याला पंजाबराव डख करणार मार्गदर्शन; उपस्थितीचे आवाहन.
पाचोरा दि.17 – पाचोरा भडगाव बाजार समितीच्या वतीने वार्षिक सर्वसाधारण सभेचे औचित्य साधत गुरुवार दि.19 सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता पाचोरा बाजार समितीच्या आवारात भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून यावेळी प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डख यांची प्रमुख उपस्थिती असून ते खरीप पिक काढणीची वेळ आलेली असल्याने शेतकऱ्यांना सोयाबीन, मका कापूस पीक सुखरूप घरात येण्यासाठी असलेल्या हवामानाचा अंदाज घेऊन शेतकऱ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत.
दरम्यान यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पाचोरा भडगाव मतदार संघाचे आमदार पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून सभापती गणेश भिमराव पाटिल यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे,बाजार समितीच्या 2023-24 या आर्थिक वर्षाच्या पत्रकांचे वाचन करून मंजुरी देणे तसेच अध्यक्षांच्या परवानगीने आयत्यावेळी आलेल्या विषयांचा विचार करणे हे कामकाज होणार आहे. या वार्षिक सर्वसाधारण सभेला पाचोरा व भडगाव तालुक्यातील सर्व शेतकरी, सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच विकास सोसायटी सदस्य,व्यापारी,हमाल मापाडी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन बाजार समितीचे व्हाईस चेअरमन पी ए पाटीलसचिव बीबी बोरुडे यांच्यासह संचालक मंडळाने केले आहे
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377