सर्वसाधारण निरीक्षक (General Observer) श्रीमती स्मिताक्षी बरुआ (IAS) यांची पाचोरा येथे भेट
पाचोरा – विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता 18- पाचोरा विधानसभा मतदार संघासाठी नियुक्त केलेले मा. सर्वसाधारण निरीक्षक (General Observer) श्रीमती स्मिताक्षी बरुआ (IAS) यांनी दिनांक 30/10/2024 रोजी पाचोरा येथे भेट दिली.सदर भेटी मध्ये निवडणूक निर्णय अधिकारी 18- पाचोरा विधानसभा मतदार संघ तथा उपविभागीय अधिकारी, पाचोरा भाग पाचोरा यांचे कार्यालयात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता स्थापन करण्यात आलेला आचारसंहिता कक्ष, निवडणूक निर्णय अधिकारी कक्ष, मिडीया सेल, एक खिडकी कक्ष, संगणक कक्ष व मतदार सुविधा कक्षाची पाहणी तसेच Strong Room ची पाहणी करुन निवडणूक संदर्भातील कामकाजाचा आढावा घेतला व आवश्यक त्या सुचना संबंधितांना निर्गमित केल्यात.
तदनंतर निवडणूक निर्णय अधिकारी कक्षात उमेदवार यांचे नामनिर्देशन पत्राच्या छाननी कामकाजा संदर्भात आढावा घेण्यात आला.सदर भेटीवेळी श्री. भूषण अहिरे, निवडणूक निर्णय अधिकारी, श्रीमती स्नेहा कुडचे संपर्क अधिकारी तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगांव, श्री. विजय बनसोडे, श्रीमती शितल सोलाट, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार पाचोरा / भडगांव व संबंधित अधिकारी, कर्मचारी हे उपस्थितीत होते.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377