अपक्ष अमोल शांताराम शिंदे व वैशाली किरण सुर्यवंशी यांचे नामनिर्देशन अर्ज वैध,यादी जाहीर.

पाचोरा – श्री भूषण अहिरे, निवडणूक निर्णय अधिकारी, 18- पाचोरा विधानसभा मतदारसंघ तथा उपविभागीय अधिकारी, पाचोरा, यांनी श्रीमती वैशाली किरण सुर्यवंशी यांच्या नामनिर्देशन पत्रावर घेतलेल्या हरकत अर्जावर पुढीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश 1. श्रीमती वैशाली नरेंद्रसिंह सुर्यवंशी यांचा श्रीमती वैशाली किरण सुर्यवंशी, रा. नांद्रे ता. पाचोरा यांनी दाखल केलेल्या नामनिर्देशन पत्र क्रं. 32 वरील हरकत अर्ज फेटाळण्यात येत आहे.2. श्रीमती वैशाली किरण सुर्यवंशी, रा. नांद्रे ता. पाचोरा यांनी अपक्ष म्हणून दाखल केलेले नामनिर्देशन पत्र क्रं. 32 हे वैध असल्याचे घोषित करण्यात येत आहे.
असे आदेश निवडणूक निर्णय अधिकारी, 18- पाचोरा विधानसभा मतदारसंघ यांनी दिल्या मुळे आता अपक्ष उमेदवार म्हणून वैशाली किरण सुर्यवंशी यांचा मार्ग सुकर झाला आहे तर दुसऱ्या निर्णयात देखील अशीच अवस्था पहावयास मिळत आहे
श्री. अॅड. अनुराग जिवाजीराव काटकर, पाचोरा यांचा श्री. अमोल शांताराम शिंदे, रा. घुसर्डी खु. ता. भडगाव यांनी दाखल केलेल्या नामनिर्देशन पत्र क्रं. 39 वरील हरकत अर्ज फेटाळण्यात आला आहे तर श्री. अमोल शांताराम शिंदे, रा.घुसर्डी खु. ता. भडगाव यांनी अपक्ष म्हणून दाखल केलेले नामनिर्देशन पत्र क्रं. 39 हे वैध असल्या चे घोषित करण्यात येत आहे. असा आदेश निवडणूक निर्णय अधिकारी, 18 – पाचोरा विधानसभा यांनी देत सदर अपक्ष उमेदवार रिंगणात उतरले मुळे उमेदवारांची संख्या वाढली आहे.
24 उमेदवारांची नामनिर्देशन यादी खालील प्रमाणे असून आता माघार कोण कोण घेते हे बघणे औत्सुक्याचे असेल.


खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



