पाचोरा तालुक्यात फक्त कामांच्या आभासाची खिचडी : नितीन बानुगडे पिंपळगाव हरेश्वरातील सभेत हल्लाबोल; वैशालीताईंना जिंकवण्याचे आवाहन
पाचोरा : पाचोरा मतदारसंघात कामांच्या आभासाची फक्त खिचडी असून याच्या ऐवजी सकस शिवभोजनासारखा विकास हवा असेल तर वैशालीताई सुर्यवंशी हाच एकमेव पर्याय असून त्यांना निवडून द्यावे असे आवाहन ख्यातनाम वक्ते प्रा. नितीन बानुगडे यांनी केले. ते पिंपळगाव हरेश्वर येथे महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशालीताई सुर्यवंशी यांच्या प्रचारार्थ आयोजीत सभेत बोलत होते.
याप्रसंगी नितीन बानुगडे पाटील यांनी आपल्या ओजस्वी वाणीने उपस्थितांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. ते म्हणाले की, “मी याआधी देखील येथे येऊन गेलेलो आहे, पण मातोश्री सोबत गद्दारी झाली असून वैशालीताई सुर्यवंशी या उद्धव ठाकरे यांच्यासोबत उभे राहिलेले आहेत. यामुळे आपणा सर्वांना निष्ठावंत वैशालीताई यांना निवडून द्यायचे आहे. विद्यमान सत्ताधारी ही भांडवलदारांची पाठीराखे असून शेतकऱ्यांचे मारेकरी असल्याची घणाघाती टीका, त्यांनी याप्रसंगी केली. ते म्हणाले की, सर्व वस्तूंच्या किंमती वाढत असताना देखील शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कपाशीला ११ हजार रूपयांचा भाव मिळत असताना आज तो फक्त साडेसहा हजारावर थांबलेला आहे. यामुळे लाखो शेतकरी नैराश्येत आहेत. शेतकऱ्यांची कपाशी घरात आली असताना २२ लाख गाठींची आयात करून सरकारने शेतकऱ्यांना नैराश्याच्या गर्दीमध्ये ढकलण्याची टीका देखील नितीन बानुगडे पाटील यांनी याप्रसंगी केली. भांडवलदारांची कर्ज माफ होत असताना शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नसल्याची टीका करताना नितीन बानुगडे पाटील म्हणाले की, या देशांमध्ये शेतकऱ्याला कोणीही वाली उरलेला नाही. यामुळे महाभ्रष्ट महायुतीच्या सरकारला खाली खेचून या ठिकाणी महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या सुरूवातील महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पुजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी दिपकसिंग राजपूत, ॲड ललिता पाटील, गणेश परदेशी, ओंकार बाबा नाईक, प्रियंका जोशी हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात नितीन बानगुडे पाटील यांच्यासह रमेश बाफणा, अरूण पाटील, अभय पाटील, उद्धव मराठे, भैय्यासाहेब ईस्माईल शेठ, बशीर शेख, सागर गावते, रसूल शेठ, राजेंद्र महाजन, वैशालीताई सूर्यवंशी, प्रकाश चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले.
या सभेला कार्यक्रमाचे अध्यक्ष वक्ते नितीन बानुगडे पाटील, देवीदास महाजन, भास्कर नाना, राजेंद्रसिंग देशमुख, अमरसिंग देशमुख, रवींद्र जाधव, राजू मोतीलाल माळी, कैलास आप्पा क्षीरसागर सरपंच, सुरेश बापू बडगुजर, राजधर आबा, गोविंद माधवराव, सुरेश गुजर, कडुबा टेलर, वसंत महाजन, गुलाम दस्तगीर – सलीम शेख, नबाब अब्बास, दगडू समींदर तडवी, बी.आर. महाजन, भिका शेठ तैनाप, कडुबा आप्पा तैनाप, महादू सांडू वाघ, प्रशांत भास्कर पाटील, शरद पाटील, भास्कर धनजी पाटील, कोमलसिंग देशमुख, भगवान पाटील, कैलास फकिरा क्षीरसागर, देविदास आप्पा, अजय कडूबा तेली, मिलिंद देव, हिलाल पाटील, अण्णाभाऊ परदेशी, डॉ. एल. टी. पाटील, प्रेमचंद पाटील, अरूण तांबे, शशी पाटील, दिलीप देशमुख, तानिया चौधरी, सिंकदर तडवी, कोमल आबा, अजय कडूबा तेली, राहूल बडगुजर, विलास भाऊ, समाधान हटकर, भारत क्षिरसागर, प्रशांत पाटील, विरेंद्रसिंग देशमुख, राजेंद्र देशमुख, राहूल चौधरी, ज्ञानेश्वर बडगूजर, मुकेश निकम, सागर क्षिरसागर, गजानन उमाळे, चेतन बडगुजर, बबलू रामसे, सलीम शेठ, बी.डी. पाटील यांच्यासह आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377