पिंपळगावसह सातगाव,वाडी शेवाळे आणि शिंदाड मधून महिलांनी दिला अभुतपूर्व प्रतिसाद
पाचोरा- माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांच्या समर्थनार्थ महिलांनी काढलेल्या प्रचार रॅलीमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला आणि प्रत्यक्ष महिलांशी संपर्क साधून प्रगतीच्या आणि विकासाच्या राजकारणासाठी महिलांनी माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांच्या पाठीशी खंबीरपणे असे आवाहन केले.
सौ.ज्योती वाघ यांच्या नेतृत्वात पिंपळगाव, डोंगरी सातगाव, वाडी-शेवाळे,शिंदाड येथे दिलीपभाऊ वाघ यांच्या समर्थनार्थ या प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रत्येक गावातील महिलांशी प्रत्यक्ष संपर्क साधून दिलीपभाऊ वाघ यांनी मतदार संघाच्या विकासासाठी जाहीर केलेला जाहीरनामा समजावून सांगत गाव आणि शहराच्या विकासासाठी दिलीपभाऊ वाघ यांना खंबीर पाठिंबा देऊन विजयी करण्याचे आवाहन देखील केले. महिलांनी देखील आपापल्या गावात या प्रचार रॅलीचे औक्षण करून स्वागत केले.आपल्या कुटुंबासह इतरांना देखील दिलीपभाऊ वाघ यांनी मतदार संघाच्या विकासासाठी मांडलेला दृष्टिकोन समजावून सांगण्यात आलं तर या गावातील महिलांनी दिलीपभाऊ वाघ यांना प्रचंड विजयाची हमी देखील दिली. दिलीपभाऊ वाघ यांनी महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने पावले उचलून महिलांसाठी देखील रोजगार निर्मितीच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या अपेक्षा देखील यावेळी महिलांनी बोलून दाखवल्या. दिलीपभाऊ वाघ यांच्या शिट्टी चिन्हावर विश्वास दर्शवत निश्चित यशाची ग्वाही देखील महिलांनी दिली.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377