राज्याच्या क्रिडा धोरणाअंतर्गत नगर विकास विभाग यांच्यावतीने आयोजीत क्रिडा व सांस्कृतीक स्पर्धांमध्ये पाचोरा नगरपरिषदेचा उत्स्फुर्त सहभाग

पाचोरा:- राज्याच्या क्रिडा धोरणाअंतर्गत नगर विकास विभाग यांच्यावतीने नगरपरिषदांमध्ये काम करत असतांना कर्मचाऱ्यांना कामाचा ताण व आरोग्य् विषयी जागरुकता निर्माण व्हावी, कर्मचाऱ्यांचे आरोग्य चांगले असावे या उद्देशाने तसेच खेळांमुळे सांघीक भावना वाढीस लागून कर्मचाऱ्यांमधील सुप्त कला-गुणांना वाव मिळण्यासाठी जिल्हा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव-2025 चे आयोजन दिनांक 27/12/2024 ते दिनांक 02/01/2025 या कालावधीत जळगांव येथे नगरविकास शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय यांचे मार्फत करण्यात आलेले होते. या दरम्यान विविध नगरपरिषदांनी सहभाग नोंदविला
पाचोरा नगरपरिषदेने देखील यात मोठया उत्साहाने विविध स्पर्धांमध्ये भाग घेत आघाडी घेतलेली होती त्यात व्हॉलीबॉल या स्पर्धांमध्ये पाचोरा संघ विजेता क्रिकेट स्पर्धेंत उपविजेता, वैयक्तीक स्पर्धांमध्ये तीन किलोमिटर चालणे यांत योगेश रेवेकर, विद्युत अभियंता, हे प्रथम क्रमांक मिळवून विजेता ठरले, समुह गायनामध्ये दिपक शेजवळ, दिपक खैरे हे उपविजेता ठरले आहेत, गोळा फेक या प्रकारात चंद्रकांत माळी हे उपविजेता ठरले. त्याच प्रमाणे सांस्कृतीक कार्यक्रमाअंतर्गत मुख्याधिकारी मंगेश देवरे, संगणक अभियंता मंगेश माने, लिपीक ललित सोनार यांनी वैयक्तीक गित सादर केले. स्वालिखित कविता वाचनात संदीप जगताप यांनी सहभाग नोंदविला. सदरचे यश हे मुख्याधिकारी मंगेश देवरे यांच्या मार्गदर्शनातून प्राप्त झाले असून त्यांनी सर्व विजय स्पर्धकांचे अभिनंदन केले असून यापुढे देखील अधिकाघीक यश प्राप्त करावे म्हणून शुभेच्छा दिलेल्या आहेत. राज्याच्या या क्रिडा धोरणाचे कर्मचाऱ्यांकडून स्वागत होत असून मोठया उत्सहात संपन्न झालेल्या या क्रिडा व सांस्कृतीक कार्यक्रमांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह असून पुढील वर्षी देखील अशा स्पर्धांचे आयोजन व्यापक प्रमाणात करण्यात यावे अशी मागणी अधिकारी / कर्मचाऱ्यांकडून होत आहे.
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



