आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
महाराष्ट्र

७ जानेवारी रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन; ईच्छुक उमेदवारांना लाभ घेण्याचे आवाहन

जळगाव, दि.3 – जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव, मॉडल करिअर सेंटर, जळगाव व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, जळगाव यांच्या संयुक्त विदयमाने दि.०७ जानेवारी रोजी सकाळी १०.०० ते दुपारी ०२.०० वाजेपर्यत रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. सर्वसाधारण १०वी व १२ वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी एल.आय.सी.जळगाव, स्पेक्ट्रम इलेक्ट्रिकल, उमाळे व बालाजी जॉब प्लेसमेंट यांच्या कडुन ६० पेक्षा जास्त रिक्तपदे ऑनलॉईन पद्धतीने कळविण्यात आली आहेत.या मेळाव्यात पात्रता धारण केलेल्या ईच्छुक उमेदवारांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेण्याकरीता https://rojgar.mahaswayam.gov.in/#/home/index या संकेतस्थळावर नांव नोंदणी केलेल्या उमेवारांनी मेळाव्यांत सहभागी होण्यासाठी विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in/#/home/Index या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या रिक्तपदांना अप्लाय करण्यासाठी आपल्या युजरआयडी व पासवर्ड ने लॉग-ईन करुल अॅप्लाय करायचे आहे.

तसेच ज्या उमेदवारांनी नाव नोदणी केलेली नाही त्यांनी देखिल सर्व शैक्षणिक पात्रतेच्या कागदपत्रांसह मेळाव्यास मुलाखतीच्या दिवशी हजर राहावे. हा मेळावा बाहेती ज्युनियर व सिनियर कॉलेज, गणेश कॉलनी रोड, रोझलेंड ईग्लिश मिडीअमच्या शेजारी, जळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे. तसेच याबाबत काही अडचण असल्यास किंवा अधिक माहितीसाठी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी (सकाळी ०९.४५ ते संध्या.०६.१५) या वेळेत कार्यालयाशी कार्यालयीन वेळेत दुरध्वनी क्रमांक ०२५७ २९५९७९० वर संपर्क साधावा असे आवाहन श्री. संदिप ज्ञा. गायकवाड, सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्द्योजकता, जळगाव यांनी केले आहे.

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377

बातमी लाईक  करा,शेअर करा

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!