शिवसेना शहर प्रमुखांच्या तत्पर प्रयत्नांनी दोन अपघात ग्रस्तांचा जीव वाचला

पाचोरा- दि 17/02/2025 रोजी रात्रीचे सुमारास पाचोरा शहरातील गौंड वस्ती जवळ दोन मोटरसायकल स्वार यांचा अपघात झाल्याने त्यात ते गंभीर जखमी झाल्यानंतर पाचोरा शिवसेना शहर प्रमुख सुमित सावंत व त्यांचे सहकारी यांनी त्या दोन जखमी रुग्णांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले व त्या ठिकाणी डॉक्टर्स उपलब्ध करून देत तत्काळ डॉक्टर व संबंधित यंत्रणेस उपचारासाठी दखल घेण्यास भाग पाडत संबधीत रुग्णांच्या नातेवाईकांना अपघाता बाबतची माहिती पुरवली. त्या दोन रुग्णांवर उपचार होणे साठी शहर प्रमुख सुमित सावंत यांनी रात्री स्वतः उपस्थित राहून ड्यूटी वर असणाऱ्या डॉक्टरांन मार्फत उपचार करून रुग्णांना दिलासा मिळवून दिला
इमर्जन्सी मध्ये ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नसल्याने रुग्णांच्या जीवाला मोठा धोका निर्माण होउ शकतो,रात्रीच्या वेळेस दवाखान्यात डॉक्टर नसल्याने इमर्जन्सी रुग्णांनी कोणाच्या भरोशावर उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात यावं हा मोठा प्रश्न निर्माण होत असतो.शिवसेना शहर प्रमुख सुमित सावंत यांनी लक्ष दिल्यामुळे दोन रुग्णांचे जीव वेळीच वाचले हे या प्रसंगामधून दिसून आले.परंतु रात्रपाळी साठी ड्युटीवर असलेल्या कर्मचारी व डॉक्टर्सनी तेथेच रुग्णालयात असायला हवे ही बाबाही अत्यंत महत्वाची आहे जेणेकरून अशा आपत्कालीन परिस्थितीत त रुग्ण आल्यास त्यांना योग्य ती वैद्यकीय मदत मिळून त्यांचे जीव वाचण्यास मदत होऊ शकते हेही या अधोरेखित करने गरजेचे वाटते.
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



