पाचोरा न्यायालयात दि पाचोरा लाॅयर्स असोशीएशन तर्फे शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा

पाचोरा, दिं 19- दीपाचोरा लॉयर्स असोसिएशन तर्फे आज पाचोरा दिवाणी न्यायालयात छत्रपती शिवाजी राजांचा जन्मोत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला गेला.
या महोत्सवाचे अध्यक्ष सीनियर एडवोकेट एस पी पाटील भाऊसाहेब होते. सूत्रसंचालन ॲड. भाग्यश्री महाजन यांनी केले. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला माल्यार्पण आणि फुले अर्पण करून सर्व वकील बांधवांनी महाराजांना अभिवादन केले.

या महोत्सवा ॲड. अनिल पाटील, ॲड. अण्णासाहेब देशमुख, दि पाचोरा लॉयर्स असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. अभय पाटील तसेच चिमुकला नक्षत्र प्रशांत येवले यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
त्यानंतर सर्व उपस्थित वकील बांधवांना शिवबा मेडिकल स्टोअर्स पाचोरा यांच्यातर्फे एक जूट बॅग आणि शिवप्रतिमा सप्रेम भेट देण्यात आले.
त्यानंतर अल्पोपाराचा कार्यक्रम झाला आणि मग सर्व उपस्थित वकील बांधव आपापल्या मोटरसायकलवर छानशी रॅली काढत छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी पोहोचली सर्वांनी महाराजांना अभिवादन केले आणि मग सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला.
पाचोरा न्यायालयात स्थापनेपासून आतापर्यंत छत्रपती शिवरायांची जयंती साजरी केली जात नव्हती त्याची सुरुवात आज पाचोरा न्यायालयात दि पाचोरा लॉयर्स असोसिएशनच्या माध्यमातून सर्व वकील बांधवांनी एकत्र येऊन केली. यामध्ये सर्वांचाच वाटा आहे. यशस्वीते साठी अॅड.अंकुश कटारे, अॅड बबलु पठाण , अॅड ज्ञानेश्वर लोहार, अॅड.रविद्र ब्राम्हणे यापदाधिकारी यांनी केले कार्यक्रमाला अॅड.रणसिग राजपुत,अॅड.बापु सैदाणे,अॅड.रवी राजपुत,अॅड.दिपक पाटील,अॅड. प्रशांत नागणे,अॅड.कैलास सोनवणे,अॅड.सचिन देशपांडे,अॅड.मानसिगं सिध्दु,अॅड.स्वप्निल पाटील,अॅड. रोशन,अॅड.राजेंद्र परदेशी,अॅड गोपाल पाटील , अॅड पी. डी. पाटील, अॅड. कालीदास गीरी अॅड. अविनाश सुतार अॅड ललित सुतार अॅड. सायली .ॲड राजु वासवानी, न्यायालयातील दिपक तायडे याच्यासह ईतर वकील बाअंधव उपस्थित होते.
या महोत्सवाला कलाशिक्षक सर तसेच रांगोळी काढण्यासाठी आवर्जून आलेल्या सुवर्णाताई पाटील यानी सुदर अशी रांगोळी सजावट केली. कार्यक्रमाचे आभार हे सचिव ॲड.सुनील सोनवणे यांनी केले.
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



