कृ. उ.बा.समिती सभापती गणेश पाटील यांच्या हस्ते शेतकरीस कर्ज पुरवठा धनादेश.

पाचोरा – महाराष्ट्र शासनाचा पणन महामंडळ यांच्या मार्फत कृ.उ बाजार समितीच्या अंतर्गत शेतमाल तारण कर्ज योजना राबविली जाते त्या अनुषंगाने कृषी उत्पन्न बाजार समिती पाचोरा यांनी शेतकरी श्री अनिल विश्वासराव पाटील यांना शेतीमाल तारण कर्ज पुरवठा केला आहे. महाराष्ट्र शासन पणन मंडळ यांच्या मार्फत राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समिती यांना शेतकऱ्यांना शेतीमाल तारण कर्ज वाटप करावे असा सूचना दिलेल्या असतात.
शेतकरी हा आपला शेतमाल जोपर्यंत रास्त भावात विकला जात नाही तोपर्यंत विकत नसतो परंतु त्याला पैशाची निकड भासल्यास किंवा खरीप हंगामासाठी भांडवल लागत असल्यास अशा प्रसंगी तो आपला शेतीमाल तारण ठेवून कर्ज घेऊ शकतो बाहेरील सावकारांकडून जास्त रकमेचे टक्केवारीने पैसे घेण्यापेक्षा शासनाने कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्यामार्फत माफक व्याजदरात साधारण सहा टक्के दर साल दर शेकडा अशा कमी दराने कर्ज पुरवठा केल्याने शेतकऱ्याला भांडवलाची व आर्थिक संकटातून वेळेवर आपल्याच शेतीमालावर कर्ज उपलब्ध होत असल्याने त्याचा शेती हंगाम व इतर गरजा भागत असल्याने शेतकरी मोठ्या संख्येने कृषी उत्पन्न बाजार समितीकडे आपला शेतीमाल तारण ठेवत असतात व त्याच तत्परतेने कृषी उत्पन्न बाजार समिती ही आपल्या शेतकरी बांधवांना कर्ज पुरवठा करीत असते.
महाराष्ट्र शासनाचा हा उपक्रम खूप वाखाण्याजोगा असून भविष्यातही असंख्य शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल येथील कृषी उत्पन्न बाजार समिती किंवा वखार महामंडळ यांच्या गोडाऊन मध्ये सुरक्षित ठिकाणी ठेवून भाग भांडवल उभे करून ते कर्ज उचलावे असे अपेक्षित आहे
पाचोरा येथे नुकतेच वखार महामंडळ येथील ठेवलेला शेतीमालावर कृषी उत्पन्न बाजार समिती पाचोरा यांनी अनिल पाटील यांना दोन लाखाचे शेतमाल तारण कर्ज वाटप केलेले आहे याप्रसंगी सभापती गणेश पाटील ,संचालक प्रकाश तांबे ,विजय कडू पाटील, युसुफ पटेल ,सचिव बाळासाहेब बोरुडे, प्रतीक ब्राह्मणे ,वसंत पाटील हे उपस्थित होते
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



