पाचोरा पीपल्स को-ऑप बँक लि.ची संचालक मंडळ निवडणूक सन 2025 ते 30 साठी वैध उमेदवारी अर्ज घोषित

पाचोरा, दि 16 – पाचोरा पीपल्स को ऑप बँक लिमिटेड पाचोरा येथील पंचवार्षिक निवडणूक 2025 ते 30 यांचे संचालक मंडळ निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाल्यापासून अनेक चर्चा रंगल्या जात होत्या परंतु 16जुन ,रोजी अंतिम वैध उमेदवार यादी निवडणूक अधिकारी आर आर पाटील यांनी प्रसिद्धीस दिली यात 48 उमेदवार रिंगणात उभे असून माघारीची दिनांक 30/ 6/2025 अशी असल्याने आता काय डावपेच आखल्या जातात आणि शह- काटशहाचे राजकारण काय होईल याकडे सबंध तालुका तसेच जिल्ह्यातील राजकीय वर्तुळ असो किंवा बँक क्षेत्रातील मोठमोठे व्यक्तिमत्व ,उद्योजक, प्रतिष्ठित व्यापारी यांचेही लक्ष लागून आहे.
सदर बँकेची निवडणूक ही दोन पॅनल मध्ये होईल असे आधी पासूनच जय्यत तयारी सुरू असल्याचे दाखवले जात होते परंतु फॉर्म भरते वेळी अनेक नाट्यमयरीत्या बदल झाले काहींचे फॉर्म हेतू पुरस्कर चुकविले गेले की नकळत हे नक्कीच अनाकलनीय नाही.असे असले तरी इतर माजी संचालक निवडणुकीतून का माघारी फिरले याचा अंदाज अनेक जाणकार मंडळींनी लावला असला तरीही पुढील काळात त्या रिकाम्या जागा कोणाच्या नावाने भरल्या जातात हेही बघणे उत्कंठतेचे आहे.

48 उमेदवारांपैकी भटक्या विमुक्त जाती जमाती मधून विकास वाघ यांचे एकमेव नाव आल्याने त्यांची बिनविरोध निवड झालेली असून उर्वरित जागा आता पॅनल टू पॅनल लढविल्या जातात की समोपचाराने माघार घेऊन बिनविरोध निवडणूक होईल यासाठीही पडद्यामागे अनपेक्षित हालचाली सुरू असल्या तरी , ती न होण्यासाठी सुद्धा कदाचित हालचाली सुरू असतील याचेही आकलन असावे.

ज्या प्रकारे लोकशाहीमध्ये जनतेचा कौल मान्य करून उमेदवार निवडले जातात तसेच अपेक्षा कुठल्याही सहकार क्षेत्रातील बँकिंग मध्ये आपले संचालक मंडळ हे सभासदांमधून, मतदारांमधून निवडले गेले पाहिजे अशी रास्त अपेक्षा ठेवणे चुकीचे नाही.परंतु त्या बँकेचे सभासद देखील तितके तत्पर, हुशार आणि सार्वजनिक हिताचे व भ्रष्टाचार विरोधी असलेले सभासद असायला हवे मरगळ आलेले, झोपी गेलेले ,झोपेचं सोंग घेतलेले किंवा आपण अमुक समाजाचे आहोत म्हणून आपलाच व्यक्ती निवडून आला पाहिजे किंवा आर्थिक दृष्ट्या आपण इतरांपेक्षा सक्षम असल्याने आपणच येथील हिटलर आहोत अशी ही धारणा कोणाच्या मनात न येता सदर सहकार्य क्षेत्रात एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या सहकाराच्या बोध वाक्याचा नेमका अर्थ जाणून सहकार क्षेत्रात वागून ज्या प्रमाणे बँकेच्या स्थापनेसाठी उद्देश निर्माण केलेला असतो त्या उद्देशा प्रमाणे सभासदांचे, कर्मचारींचे सर्व सामाजिक ,आर्थिक हित व प्रगतीच्या दृष्टीने पावले उचलली गेली पाहिजे अन्यथा सहकार क्षेत्रातील बँक स्थापन करण्याचा उद्देश फक्त लिमिटेड व्यक्तींना, व्यवसायांना, संस्थांना फायदा होईल किंबहुना त्या माध्यमातून आपले पितळ सोने करून घेता येईल अशी भावना पण निर्माण नको व्हायला.एकंदरित “विना सहकार जनाचा नाही उद्धार” हि अनुभूती अंगीकृत करायला तितकेच प्रगल्भ,प्रभावी नेतृत्व उदयास यायला हवे हेच सहकार चळवळीतील परिपाक असून नंदी बैला प्रमाने गुबु गुबू ढोल वाजले की मुक संमती दर्शविली अशा प्रकारची “नंदिशाही” सहकाराला अपेक्षित नाही हेच आत्मसात व्हावे ?.
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



