पाचोरा येथील नरेंद्र पाटील यांना फ्रान्स येथिल विद्यापीठा मार्फत डॉक्टरेट प्रदान व इंडो ग्लोबल अवॉर्डनेही सन्मानित.
पाचोरा- येथील रहिवासी नरेंद्र पंडितराव पाटील यांना नुकतेच मलेशिया येथे थेम्स विद्यापीठ फ्रान्स यांचे मार्फत डॉक्टर पदवी प्रदान करण्यात आली तसेच त्यांचे उद्योजक क्षेत्रातील असलेले उल्लेखनीय काम सबंध भारत देशात सुरू असल्याने व विविध परकीय देशामध्ये उद्योग – व्यापार क्षेत्रातही व्यवसायीक तसेच उद्योजक यांची माहिती आदान प्रदान करीत रोजगानिर्मिती तसेच द्विय देशांमधील व्यापारिक सबंध दृढ करून आर्थिक विकास साधणे अशी कामगिरी करीत असताना अनेक महत्वपूर्ण प्रोजेक्ट ग्लोबलाइज कार्यान्वयीत करणे आदी कारणांनी त्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतल्या गेली त्याचेच फलित म्हणुन त्यांना इंडो ग्लोबल एक्सलन्स अवॉर्ड ही देण्यात आला.
पाचोरा येथील विकास कॉलनी मधील ते रहिवासी असून व खान्देश क्षेत्रातील एक उमदा व्यक्तिमत्व आज फक्त देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव लौकिक मिळवत असल्याने शहराचे नाव जागतिक स्तरावर पोहोचले आहे ही एक अभिमानास्पद बाब आहे.
त्यांच्या जिद्द,चिकाटी आणि मेहनती स्वभाव तसेच परिवारातील सदस्यांची वेळोवेळी लाभत असलेली साथ शिवाय भला मोठा मित्रपरिवार यामुळे नक्कीच त्यांना काम करण्याची ऊर्जा प्राप्त होते यात काही शंका वाटण्यासारखे नाही. त्यांची प्रगती पाहता ते एक दिवस भारत देशाची प्रतिमा जागतिक स्तरावर नक्कीच अभिमानाने उंचावतील हेही सत्य आज बोलावेसे वाटते.
नरेंद्र पाटील यांनी अनेक कठीण परिस्थितीतून उद्योग क्षेत्रात आपले पाय रोवलेत तसेच मेहनत करण्याची त्यांची वृत्ती असल्यामुळे ते प्रगतीपथावर दिसत आहे प्रत्येकाने यशस्वी होण्यासाठी जर अशा प्रकारचे मेहनत केली तर नक्कीच आपले गाव आपले शहर , राज्य,देश प्रगती केल्याशिवाय राहणार नाही हे अधोरेखित करावेसे वाटते.त्यांना पुढील वाटचालीसही शुभेच्छा व अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहावी अशी सर्व पंचक्रोशीतील नागरिकांची प्रार्थना असल्याचे कळते.
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



