पाचोऱ्यात आरोग्य तपासणीला उत्स्फूर्त प्रतिसाद,बांधकाम कामगारांसाठी आरोग्य शिबीराचे आयोजन

पाचोरा – पाचोरा शहरातील प्रभाग क्रमांक 8 मध्ये बांधकाम कामगार बांधवांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 22 जून ते 27 जून 2025 या कालावधीत दररोज दुपारी 1.30 ते 4.30 या वेळेत हे शिबिर सुरू राहणार आहे.
या उपक्रमाचे मार्गदर्शन पाचोरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. किशोरआप्पा पाटील यांनी केले असून, आयोजन जनसेवक बंडू केशव सोनार यांच्या पुढाकारातून करण्यात आले आहे.
एच.एल.एल. आणि हिंदू लॅब यांच्या वतीने कर्मचारी अमित वाणी आणि फिरोज शेख यांच्या उपस्थितीत आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. या तपासणी शिबिरामध्ये खालील सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत:
🔹 ऑनलाईन नोंदणी
🔹 वजन तपासणी
🔹 ब्लड शुगर चेक
🔹 बीपी तपासणी
🔹 डोळ्यांची तपासणी
🔹 फुफ्फुस तपासणी
🔹 उंची मोजणे
यामध्ये सर्व बांधकाम क्षेत्रातील कामगारांची आरोग्य तपासणी करण्यात येत असून,त्यांना योग्य वैद्यकीय सल्लाही दिला जात आहे. प्रभागातील सर्व कामगार बांधव व भगिनींनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
ही एक स्तुत्य आणि गरज लक्षात घेऊन राबवलेली आरोग्य विषयक सेवा असून आरोग्य चाचणीसाठी बांधकाम क्षेत्रातील लोकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले जात आहे.
तसेच जनतेने आमदार किशोर आप्पा पाटील व बंडू भाऊ सोनार यांचे आभार मानले आहे , बंडूभाऊ सोनार यांना भविष्यात यश मिळत राहो व प्रगती होत रहावी असा सूर जनतेमधून निघत आहे.
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



