13 जुलै 2025 रोजी पाचोरा पीपल्स बँक पंच वार्षिक निवडणुकीसाठी मतदान होणार❓श्री.उमेश राऊत लढणार!

पाचोरा- पाचोरा पीपल्स को ऑप बँक लिमिटेड पाचोरा या बँकेची सन 2025-30 पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम घोषित झालेला असून दिनांक 30 जून रोजी पर्यंत माघारीची तारीख असून एक तारखेला चिन्ह वाटप झाल्यानंतर दोन ते अकरा जुलै या तारखे पर्यंत प्रचार /प्रसार करण्याचा अवधी असून 13 जुलै रोजी मतदान होणार आहे.
48 वैध उमेदवरांपैकी पैकी 1 जागा विजाभज /NT मधील बिनविरोध झाली असून 14 जागा लढविल्या जातील आता दि 30 जुन रोजी कोण माघार घेईल आणि कोण निवडणूक लढेल याची शक्यता चाचपडून बघितल्या जात आहे तसेच विद्यमान संचालक मंडळाने आपल्या गोटात येण्यासाठी अनेकांची सहमती मिळाल्याचा दावा केलेला जरी असला तरी राजकारणात ऐन वेळी काय उलथा पालट होईल हे सांगणे कठीणच असते.ऐक नवीन व्यक्ती चांगल्या लोकांना सोबत घेऊन निवडणूकिस सामोरे जाऊन मतदारा पर्यंत आशीर्वाद घेण्यासाठीही जाणार ही शक्यता नाकारता येणार नाही.
सहकाराच्या माध्यमातून सहकार्य व्हावे किंवा हित जोपासले जावे ही प्रामाणिक भूमिका जरी प्रतीत होत असली तरी ती राबविण्याची जबाबदारी देखील तज्ञ, सूज्ञ अशाचीं असते. सहकारात राजकारण नको असे वर करवी भासवायचे परंतु राजकारणाच्या फॉरमॅट प्रमाणे डावपेच करत निवडणुकींना सामोरे जाऊन अपेक्षित पदप्राप्ती करायची हीच भावना आता कुठल्याही निवडणुकांमध्ये लागू झालेली आहे.
सहकार असो की राजकारण सर्वच क्षेत्र कूटनीतीने बरबटलेले आहेत.ज्या मूळ उद्देशासाठी सहकार क्षेत्राची निर्मिती झाली ज्या सहकारातून गोरगरीब आर्थिक दुर्बल घटक विकास न झालेला घटक या सर्वांना सोबत घेऊन सहकार्य करून सहकारी संस्थांमधून उपेक्षित घटकांना न्याय द्यावा तोही समान न्याय पद्धतीने मिळावा या अपेक्षेने वागणे गरजेचे असते परंतु आता अशा क्षेत्रांमध्येही दुजाभाव होत असतो चेहरे पाहून अथवा त्याची काही पदस्त व्यक्तींबरोबर असलेली जवळीक किंबहुना त्या व्यक्तीपासून मिळत असलेला वैयक्तिक फायदा या गोष्टी आता नित्य नियमाच्या झालेल्या आहेत उपेक्षित दिन दुबळे यांचे कैवारी आता दुरापास्त झालेले दिसतात.
पाचोरा पीपल्स बँकेच्या होऊ घातलेल्या संचालक मंडळ निवडणुकी बाबत अनेक चर्चांना ऊत येत असला तरी माघारी पर्यंत काय हालचाली होता हे बघणेही गरजेचे आहे ज्या लोकांना निवडणूक लढवायची आहे ते जरी शांत असले तरी आपल्या पद्धतीने निवडणुका बिनविरोध होत असल्याचं भासवण्याचा प्रयत्न काही मंडळी जरी मतदारांसमोर करत असले तरी मतदारांना निवडणूक होणे अपेक्षित असते. यात ज्या व्यक्तीना /पॅनलला जास्त मते मिळतील सहाजिकच तो निवडून येणार आहे त्यामुळे उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग करण्यापेक्षा काहींनी वेळेची वाट बघणे हे महत्त्वाचे ठरते.
ज्या सभासदांनी सक्षम,पारदर्शक बेदाग असे संचालक मंडळ निवडून दिले असेलही तर त्यांच्या कार्यप्रणालीला नक्कीच सभासद हे सलाम ठोकतील आणि त्याची जाहीर वाच्यता देखील स्व मुखातून करतील परंतु
“जिनके दामन ही दागदार हो चुके है !
उन्हे अपने महफिल में बडी तबीयत से बुलाकर!
आओ हूजुर खावो खजूर पिओ ” रूह अफजा”!
अब मत देना रहा मुआवजा !
अशा मथितार्थने चित्र जाहीर केल्याने आता मात्र सभासद यांनी आपल्या सदसदविवेक बुद्धीचा वापर करून अशा दुतोंडी सापाचा फणा ठेचावा ही लोकशाही मार्गाने निवडणुकीतून समज देण्याची पद्धत आहे नाही तर देशातील ऐक नवीन ब्रँड ची वॉशिंग मशीन आल्याचे सोशल मीडियावर कायम फोटो व्हायरल होत असतात ज्यातून वॉशिंग केल्याने सर्व तथाकथित आरोप,भ्रष्टाचार,दुराचार,घोटाळे, हनीट्रॅप आदी तत्सम बाबी अगदी अशा पद्धतीने क्लीन होतात की परत त्यावर कोणी ब्र शब्दी उच्चारू शकत नाही. असो
आता निवडणुकीतून माघार कोणी घ्यावी आणि कोणी लढावे हा ज्याचा त्याचा वयक्तीक प्रश्न आहे कोणावर काय दबाव,विनंती,समज,आमिष, मध्यस्ती, आश्वासने आदी देऊन माघारी होतात का यावर सभासदांचे व राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले गेले आहे तर काहींनी इलेक्शन होणार असल्याने प्रचारची तयारी सुरू केली आहे.


खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



