समता सैनिक दलातर्फे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची 151 वी जयंती उत्साहात साजरी..!!

पाचोरा – आजच्या देशाच्या, सामाजिक व राजकीय परिस्थितीतही राजर्षी शाहू महाराजाचे असे उद्गार तंतोतंत लागू होतात. आयु.किशोर डोंगरे यांचे प्रतिपादन. दि.26 जुन रोजी सकाळी 10 वाजता पाचोरा येथील समता सैनिक दलाच्या तालुका कार्यालयात तालुका कार्यकारणीच्या वतीने लोकराजा छत्रपती शाहू माहाराजांची प्रतीमेस माल्य अर्पन करुण जयंती साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रमासाठी समता सैनिक दलाचे जेष्ठ विधी सल्लागार अॅड. मा.ईश्वर जाधव व प्रमुख मार्गदर्शक म्हणून समता सैनिक दलाचे जळगांव जिल्हा अध्यक्ष आयु. किशोर डोंगरे हे उपस्थित होते.
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी दि.१५ एप्रिल १९२० रोजी नाशिक येथील ‘श्री उदाजीराव मराठा विद्यार्थी वसतिगृहाच्या’ शुभारंभ करते वेळी केलेले उद्गार असे की,
“सर्व जातींच्या पुढाऱ्यांना माझे सांगणे आहे की, आपली दृष्टी दूरवर ठेवा, पाया पुरते पाहू नका. जातिभेद मोडणे इष्ट आहे. जातीभेद पाळणे हे पाप आहे.देशोन्नतीच्या मार्गात हा अडथळा आहे. हा दूर करण्याचे प्रयत्न जोराने केले पाहिजेत,ही जाणीव पक्की ध्यानात ठेवून मग ह्या दिशेचा प्रयत्न म्हणून जाती परीषदा भरवा, जातीबंधन दृढ करणे, जातीभेद तीव्र होणे हा परिणाम ह्या परिषदांचा होऊ नये ही खबरदारी घेतली पाहिजे.”आजच्या देशाच्या सामाजिक व राजकीय परिस्थितीतही असे उद्गार तंतोतंत लागू होतात
सामाजिक न्यायाच्या जोडीला शिक्षण, शेती, जलसंधारण, साहित्य- कलासंवर्धन, संस्थात्मक सुधारणा अशा प्रत्येक क्षेत्रात आपल्या दुर्दम्य दूरदृष्टीने काम करणारे महान प्रशासक बहुजनांच्या सक्षमीकरणा बरोबरच समांतरपणे समाजाची सांस्कृतिक आणि आर्थिक पुनर्रचना घडवणारं सूर्यासम अमोघ नेतृत्व महाराष्ट्राला मिळणं,ही त्याकाळी फार महत्त्वाची गोष्ट होती.
शेती क्षेत्रात त्यांनी सुधारित बियाणं,बँक सुविधा, कालवा योजना राबवल्या. कोल्हापुरात त्यांनी संस्थात्मक स्वरूपात जो बदल घडवून आणला,तो नंतर संपूर्ण महाराष्ट्राच्या सामाजिक-राजकीय प्रवाहाला दिशा देणारा ठरला.ज्यांनी गादीचा उपयोग व्यवस्थेच्या मुळावर घाव घालण्यासाठी केला,असे महान लोकराजां राजर्षी शाहू महाराज ..असे आयु. किशोर डोंगरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.या कार्यक्रम प्रसंगी समता सैनिक दलाचे जिल्हा सचिव आयु.
अरूण खरे तर पाचोरा तालुका अध्यक्ष आयु. ज्ञानेश्वर सावळे हे उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी, तालुका उपाअध्यक्ष आयु. राहुल साठे,तालुका सचिव आयु.विक्की ब्राह्मणे,शहर अध्यक्ष आयु.शांताराम सोनावणे,तालुका संघटक आयु.कैलास सोनवणे, तालुका सह संघटक आयु.ऋषिकेश पाटील,आयु.दीपक भिल,आयु.सुपडू भिल,आयु.विनोद भिल,अदि. पदाधिकारी यांनी परीश्रम घेतले व उपस्थिताचे आभार तालुका अध्यक्ष आयु.ज्ञानेश्वर सावळे यांनी मानले.
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



