
विद्यार्थ्यांनी आपली आवड ,क्षमता ,मर्यादा, प्राविण्य व कौशल्य ओळखून करिअर निवडा – प्रा. राजेंद्र चिंचोले
पाचोरा – शिंदे इंटरनॅशनल स्कूल पाचोरा येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ नुकताच संपन्न झाला. शाळेच्या सभागृहात गिरणाई संस्थेचे चेअरमन तात्यासाहेब पंडित शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक प्रा.राजेंद्र चिंचोले, संचालक ॲड. जे. डी. काटकर , प्राचार्य डॉ. विजय पाटील ,अरुण पाटील उपस्थित होते.
या कार्यक्रमात बोलताना प्रा. राजेंद्र चिंचोले यांनी विद्यार्थ्यांनी आपली आवड, क्षमता ,मर्यादा प्राविण्य , कौशल्य , ओळखून व विविध पर्यायांची माहिती घेऊन करिअर निवडावे असे स्पष्ट करत नीट (NEET) परीक्षेबद्दल सखोल मार्गदर्शन केले. इंजिनिअरिंग व मेडिकल याव्यतिरिक्त करिअरच्या असंख्य शाखांची माहिती देऊन या शाखांचा देखील विद्यार्थ्यांनी करिअर निवडताना विचार करावा अशा प्रकारचे मार्गदर्शन प्रा. राजेंद्र चिंचोले यांनी केले. विद्यार्थ्यांनी आपले करिअर गुणांवर न ठरवता आपल्यातील क्षमता ओळखून करिअर ठरवावे त्याचवेळी जिद्द चिकाटी आणि समर्पण या त्रिसूत्रीच्या माध्यमातून विद्यार्थी जीवनात आपले ध्येय गाठू शकतो असे मार्गदर्शनही त्यांनी केले.
ॲड. जे. डी. काटकर यांनी विद्यार्थ्यांनी भविष्यात आपल्याला काय व्हायचे आहे? हे ध्येय निश्चित करावे व त्याच्या प्राप्तीसाठी अथक परिश्रम करून यशस्वी व्हावे अशा शुभेच्छा दिल्या. प्राचार्य डॉ. विजय पाटील यांनी विद्यार्थ्यांमध्ये महत्वाकांक्षा असेल प्रतिकूल परिस्थितीतही ध्येय प्राप्ती करून यशस्वी होता येते” अशा आशयाचे प्रतिपादन केले. पालकांच्या वतीने अरुण पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमास पालक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिंदे इंटरनॅशनल स्कूलच्या शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



