गौतम सोनवणे पाचोरा तालुका उपाध्यक्ष, तर अन्वर शेख शहर उपाध्यक्षपदी नियुक्त

पाचोरा :- दि. ३ जुलै २०२५ – महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई या पत्रकार संघटनेच्या वतीने आज पाचोरा येथील शासकीय विश्रामगृहात एक महत्त्वपूर्ण नियुक्ती समारोह पार पडला. या वेळी गौतम सोनवणे यांची पाचोरा तालुका उपाध्यक्षपदी, तर अन्वर शेख यांची शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
ही नियुक्ती संघटनेचे संस्थापक संघटक संजयजी भोकरे, प्रदेशाध्यक्ष गोविंदजी वाकडे आणि राज्य सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांच्या मार्गदर्शनानुसार झाली असून, नियुक्तीपत्र प्रदेश उपाध्यक्ष किशोर रायसाकडा यांच्या अध्यक्षतेखाली उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष भुवनेश दुसाने यांच्या मार्गदर्शनाखाली , प्रदान करण्यात आले.
यावेळी संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य अबरार मिर्झा, पाचोरा शहर अध्यक्ष छोटूभाऊ सोनवणे, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे शहर अध्यक्ष कुंदन बेलदार, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष राकेश सुतार तसेच संजय कल्याणकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
या निवडीमुळे स्थानिक पत्रकारितेला नवचैतन्य मिळेल, असा विश्वास संघटनेतून व्यक्त करण्यात येत आहे.
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



