
पुणे, दि.8 – पुणे महानगरपालिकेच्या कचरा व्यवस्थापन विभागात शहरातील करदात्यांच्या पैशांचा गैरवापर होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. देशाची राजधानी दिल्ली तसेच इतर प्रमुख शहरांमध्ये यशस्वीपणे सुरू असलेल्या कचरा प्रकल्पांचा अभ्यास न करता महापालिकेने थेट निविदा काढून केवळ काही निवडक कंत्राटदारांना लाभ होईल अशा पद्धतीने निर्णय घेतल्याचे समोर येत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, दिल्लीत कचरा व्यवस्थापनाचा खर्च प्रति टन फक्त ४०० रुपये इतका येतो, तर पुणे महापालिकेकडून याच कामासाठी तब्बल १००० रुपये प्रति टन इतका खर्च केला जात आहे?. इतका मोठा आर्थिक फरक असूनही संबंधित अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला जात आहे.
विशेष म्हणजे, पुणे टॅक्स पेयर्स (करदाते) यांच्या पैशातून होणाऱ्या या अनावश्यक खर्चामुळे शहराच्या इतर मूलभूत गरजा आणि विकासकामे मागे पडण्याची शक्यता आहे.
निविदा प्रक्रिया, कंत्राटदारांची निवड आणि खर्चाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.
विदेशात कचरा पासून उत्पन्न कसे मिळेल यावर चर्चा करतात पण पुणे महानगरपालिका कचरा विभाग खर्च कसा काय वाढेल व मोठय़ा निविदा काढून कसे पैसे खर्ची घातले जातील यात त्यांचा कल असतो.
डॉ नरेंद्र पाटील
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



