आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
महाराष्ट्र
Trending

शेतकर्‍यांची दिवाळी गोड करा पाचोऱ्यात महाविकास आघाडीचेआंदोलन,सरकार विरोधात घोषणांनी जारगांव चौफुली दणाणली

पाचोरा – अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे तालुक्यात मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना दिवाळी पुर्व अनुदान देण्यात यावे या मागणीसाठी महाविकास आघाडी ने जारगांव चौफुली येथे रस्ता रोको आंदोलन केले.

पाचोरा तालुक्यात मागिल काही दिवसांत अचानक अतिवृष्टीमुळे व ढगफुटीमुळे आलेल्या प्रचंड पाण्याने शेतकऱ्यांचे अपरिमित असे नुकसान झाले आहे. शासनाने पॅकेज च्या नावाखाली या बाधीत शेतकऱ्यांना शासकीय अनुदान काही प्रमाणात जाहीर केले आहे. जे अनुदान जाहीर केले ते दिवाळीच्या आधी त्यांच्या बँकखात्यात जमा करा जेणेकरून त्यांची दिवाळी गोड जाईल. अशा मागण्या सह शिवसेना उबाठा सह राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अर्थात महाविकास आघाडी ने आज दि १६/१०/२०२५ रोजी पाचोरा जारगांव चौफुली येथे रास्ता रोको आंदोलन केले.
यावेळी शिवसेना उबाठा चे उपनेते गुलाबराव वाघ, माजी उपजिल्हाप्रमुख ॲड. अभय पाटील, माजी सभापती उध्दव मराठे, रमेश बाफना, राष्ट्रवादी काँग्रेसचे नितीन तावडे, अझहर खान कॉग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, माजी सभापती शेख इस्माईल शेख फकीरा, अॅड अविनाश भालेराव या सह पदाधिकारी उपस्थितीत होते.
यावेळी कपाशी साठी सीसीआय सुरू करा,ज्यांच्या घरात पाणी घुसले त्यांना ना. गिरीश महाजन यांनी घटनास्थळावर आमदारांच्या समक्ष जाहीर केलेले घरटी एक लाख त्वरीत द्या, सोयाबीन व ज्वारी ची शासकीय खरेदी त्वरीत सुरू करा, शेतकरी अनुदान घोटाळाची चौकशी त्वरीत करुन ज्यांच्या अनुदान काढले गेले त्यांना त्वरीत पैसे द्या, दोषींवर कारवाई झालीच पाहिजे, खरडुन गेलेल्या जमीनीचे हेक्टरी पाच लाख त्वरीत रोख स्वरुपात द्या, विहीरीत गाळ काढण्यासाठी त्वरीत दोन लाख द्या, दुधाळ जनावरे यांच्यासाठी एक लाख द्या, शहरातील पंचनामे केलेली नुकसान भरपाई तात्काळ द्यावी अशा विविध मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार कुमावत यांना देण्यात आले.

यावेळी महाविकास आघाडीचे शिवसेनेचे उपनेते रावेर लोकसभा संपर्कप्रमुख गुलाबरावजी वाघ, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख उद्धव मराठे, ज्येष्ठ शिवसैनिक रमेश बाफना, माजी उपजिल्हाप्रमुख अॅड. अभय पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी शेख इस्माईल शेख फकीरा , इरफान मणियार, झानेश्वर पाटील, ॲड. मंगेश गायकवाड, श्रावण गायकवाड, प्रकाश निकम, संदीप पाटील, चेतन बनसोडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी नितीन तावडे, शहराध्यक्ष अजहर खान,युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख शशिकांत पाटील, शिवसेना शहर प्रमुख अनिल सावंत, विनोद बाविस्कर माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, माजी पंचायत समिती सभापती रवींद्र पाटील, माजी उपसभापती अरुण तांबे, उपतालुकाप्रमुख ज्ञानेश्वर भाऊ, प्रेमचंद पाटील, युवा सेना जिल्हा संघटक प्रशांत पाटील, युवा सेना तालुकाप्रमुख निखिल भुसारे, शहर प्रमुख मनोज चौधरी, शहर प्रमुख हरीश देवरे,उपशहर प्रमुख खंडू सोनवणे पप्पू जाधव, भारत पाटील, सर्जेराव पाटील , रतन परदेशी, आनंदा पाटील, पितांबर मिस्त्री गोकुळसिंग गांगुर्डे, सांडू तडवी, अमोल महाजन, चंद्रकांत पाटील, गजू पाटील,भिकन तडवी, गुलाब पाटील, दिनकर गीते. असंख्य महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी शासनाचे प्रतिनिधी म्हणून नायब तहसीलदार श्री कुमावत यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून निवेदन स्वीकारले व शासनाकडे ते पाठविणार असल्याचे सांगितले.

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377

बातमी लाईक  करा,शेअर करा

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!