महाराष्ट्रात पहिल्यांदा तृतीयपंथी महाराजांचे कीर्तन

पाचोरा- शहरात लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्था (अनाथालय) पाचोरा आयोजित सुरू असलेल्या राज्यस्तरीय महिला किर्तन महोत्सवामध्ये दररोज महाराष्ट्रभरातून विविध भागातून महिला कीर्तनकार येऊन आपली सेवा देत आहेत व विविध विषयांवर आपले मत मांडत आहेत त्यात स्त्री सबलीकरण महिला सुरक्षा महिला स्वास्थ्य हुंडाबंदी कन्याभ्रूणहत्या अशा विविध विषयांवर आपले मत मांडून स्त्रियांना एक स्वतंत्र व्यासपीठ च्या माध्यमातून आपले मत मांडत आहेत
कीर्तनाला हजारोंच्या संख्येने परिसरातून स्वखर्चाने गाडी वाहन ट्रॅक्टर च्या माध्यमातून भाविक येत आहेत व किर्तन श्रवणाचा लाभ घेत आहेत या कीर्तन सप्ताहामध्ये प्रथमच अलीकडे महाराष्ट्रातील तृतीयपंथी मधून पहिले कीर्तनकार दौंड येथील समाधान महाराज म्हणजेच उर्फ समा माय यांचे कीर्तन झाले त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून तृतीय पंथ यांच्या जीवनातील व्यथा मांडल्या व सांगितलं की समाज आम्हाला नोकरीत स्थान देतो आम्ही न स्त्रियांमध्ये स्थान मिळतं ना पुरुषांमध्ये स्थान मिळतं आम्ही जावं तरी कुठे जावं लोक आमच्याकडे पाहून मान वाकडी करून घेतात व आमच्याकडे तुच्छतेच्या नजरेने पाहतात का आम्ही जीव नाहीत का तुमच्या घरात जर असं बाळ जन्माला आला असता तर तुम्ही काय केलं असतं तुम्ही त्यालाही असे वाऱ्यावर सोडले असते का आम्ही सुद्धा समाजाचे घटक आहोत आम्हाला सुद्धा समाजामध्ये स्थान द्या
पुढे ते म्हणाले की आम्हाला खऱ्या अर्थाने जर कोणी स्थान दिलं असेल ते वारकरी संप्रदायाने कारण वारकरी संप्रदायामध्ये तुकाराम महाराज म्हणतात सकळशी येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे किंवा या रे या रे लहान थोर याती भलते नारी नर या शब्दांमध्ये भलते या शब्दाचा अर्थ म्हणजे तृतीयपंथी आहे म्हणजेच आम्हाला सुद्धा अधिकार आहे आणि तो सन्मान आम्हाला सुनीताताई व योगेश महाराज यांच्या माध्यमातून मिळाला याचा आम्हाला आनंद वाटतो
याप्रसंगी गावातील सर्व तृतीयपंथी बांधव हे उपस्थित होते त्यांचा सुद्धा सन्मान लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्थेतर्फे करण्यात आला त्यांनी सुद्धा कृतज्ञता व्यक्त करताना सांगितले की आज पर्यंत आम्हाला लग्नात नाचण्यासाठी बोलवण्यात आले आम्हाला कोणाच्या घरी बाळ जन्माला तिथे बोलवण्यात आले पण पहिल्यांदा आम्हाला किर्तन श्रवण करण्यासाठी आणि कीर्तनाचा लाभ घेण्यासाठी आमंत्रण मिळालं आणि आमचा सन्मान झाला याचा आम्ही आयुष्यभर ऋणात राहू असे आपले भाव व्यक्त केले
सदर कीर्तनाला संपूर्ण तालुकाभरातून व तसेच जिल्ह्याभरातून वारकरी भाविकांनी हजेरी लावून महाराजांचे व संस्थेच्या कार्याचे कौतुक केले किर्तन सप्ताहाची सांगता येत्या गुरुवारी दिनांक 27 रोजी आहे त्या दिवशी येणाऱ्या सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले आहे त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेच्या अध्यक्षा सुनीता ताई पाटील व योगेश महाराज पाटील यांनी केलेले आहे
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



