पिढीत परिवाराला न्याय द्या अन्यथा जन आंदोलन उभे करु -आयु.किशोर डोंगरे

भडगांव – दोन दिवसांपूर्वी पिंपरखेड येथील पारेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यालगतच्या तलावात वाल्मिक संजय हडीगे (वय २७) या तरुणाचा मृतदेह आढळला होता. नातेवाईकांनी तेव्हा ही घातपाताचा संशय व्यक्त करत सखोल चौकशीची मागणी केली होती. ही घटना ताजी असतानाच, रविवारी सकाळी याच तलावाच्या पाण्यात नारायण रामदास हडीगे (वय ५२) यांचा मृतदेह तरंगताना ग्रामस्थांना दिसला.एका दिवसाच्या अंतराने गावातील दोन तरुणांचे मृतदेह आढळल्याने गावात भीतीचे वातावरण पसरलेतालुक्यातील पिपरखेड येथे एकाच तलावात अवघ्या दोन दिवसांच्या अंतराने दोन तरुणांचे मृतदेह आढळल्याने गावात मोठी खळबळ उडाली आहे.
दुसऱ्या मृतदेहामुळे संतप्त झालेल्या मृतांच्या नातेवाईकांनी व ग्रामस्थांनी भडगाव-कासोदा रस्त्यावर तब्बल तीन तास रास्तारोको आंदोलन करत घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. चौकशी कामी तीन जणांना पोलीस स्टेशनला बोलविण्यात आले.हि बातमी समता सैनिक दलाच्या भडगांव कार्यकारणीला कळताचं दलाचे जिल्हाध्यक्ष आयु.किशोर डोंगरे सह पाचोरा तालुक व जिल्हा कार्यकारणी सदस्या सोबत पीडित परिवाराची भेट घेत घटनेची पूर्ण माहिती समजून घेतली भडगाव पोलिस निरीक्षक महेश वर्मा व डी.वाय.एस.पी.बापू रोहम यांची भेट घेत पीडित परिवाराला न्याय द्यावा अन्यथा स.सै.दला तर्फे जन आंदोलन उभे करु असे सुचक इशारा दिला.
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



