प्रभाग क्रमांक 8 पाचोरा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी श्री गणेश भिमराव पाटील व सौ मीनाक्षी संजय एरंडे यांची नावे जाहीर, उद्या प्रचाराचा नारळ फोडणार

पाचोरा – लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ सुनीता किशोर आप्पा पाटील व क्र.8 प्रभागाचे चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे तरी पाचोरा शहरातील व प्रभाग क्रमांक 8 चे शिवसेना-युवासेना, महिला आघाडी व अंगीकृत संघटनांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सदर रॅली मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन उमेदवारांतर्फे कऱण्यात आले आहे.
उद्या गुरुवार दि.13 नोव्हेंबर 2025 सकाळी 9.00 ते 12.00 वाजे पर्यत असणार आहे व स्वामी समर्थ केंद्र संघवी कॉलोनी भडगाव रोड पाचोरा येथून मा.कार्यसम्राट आमदार श्री किशोर आप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रचाराचा नारळ फोडून “चला पाचोर्याच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्र येऊ या” अशा ब्रिध वाक्याने जनते समोर केलेल्या विकास कामांचा लेखा जोखा मांडत पुन्हा निवडून देण्यासाठी मतांचा जोगवा उमेदवार मागणार आहेत तसेच सदर प्रभागात नाविन्य पूर्ण योजना राबविण्यासाठी व विकासाची वाटचाल अविरत सुरू ठेवण्यासाठी उमेदवार रिंगणात उतरले आहे.
तरी नागरिकांनी मतदान रुपी दान त्यांच्या पारड्यात टाकावे अशी रास्त अपेक्षा ठेवत सर्व उमेदवार जोमाने तयारीला लागलेले आहे व जनतेलाही त्यांनी विकासाचे साथ द्यावी असे आवाहन केलेले आहे.
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



