मोंढाळे जि.प.शाळा येथे वृक्षारोपण व क्रिडांगण भूमिपूजन संपन्न

पाचोरा:तालुक्यातील मोंढाळे जि.प. मराठी शाळा येथे श्री मधुभाऊ काटे जि.प. सदस्य यांच्या “शाळा तेथे वृक्षारोपण” या संकल्पनेतून प्रत्येक शिक्षकास पाच रोपे याप्रमाणे शाळेत वृक्षारोपण करणेस प्रवृत्त केले व सद्य परिस्थीतीत कोरोना महामारीमुळे प्रत्येकास प्राणवायु ची किंमत कळली आहे किंबहुना चुकवावी लागत आहे आणि वृक्षतोडीचा परिणाम ही भोगावा लागत आहे.त्यासाठी नैसर्गिक प्राणवायु आणि पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण ही काळची गरज ठरली आहे.
तसेच क्रिडांगण विकास या योजनेतून श्री मधुभाऊ काटे जि.प सदस्य यांचे निधीतुन कबड्डी,खो-खो, व्हॉलीबॉल या क्रिडांगणाच्या विकासासाठी भूमिपूजन झाले. सदर कार्यक्रमास श्री मधुभाऊ काटे जि प सदस्य, श्री भाऊसो डी.एम पाटील जि.प. सदस्य, श्री सुभाष पाटील माजी सभापती पं.समिती पाचोरा,श्री प्रदिप नाना पाटील हे मान्यवर उपस्थीत होते तसेच कार्यक्रमास म.सरपंच व सदस्य, अध्यक्ष व सदस्य शाळा व्यवस्थापन समिती, श्री धनराज पाटील सर, केंद्रप्रमुख श्री चिंचोले सर उपस्थित होते कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक मनोहर सोनवणे व शिक्षकवृंद यांनी परिश्रम घेतले.

वृक्षारोपण व क्रिडांगण भूमिपूजन प्रसंगी ऊपस्थित मान्यवर

बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377



