आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
महाराष्ट्र
Trending

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सावानिमित्त आयोजित’फिट इंडिया फ्रीडम रन’ मध्ये धावले जळगावकर

जिल्हा प्रशासन व नेहरु युवा केंद्राचा संयुक्त उपक्रम

          जळगाव,दि. 18 – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. सदृढ आणि सक्षम भारत निर्माण करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि नेहरू युवा केंद्र, जळगावतर्फे आज आयोजित करण्यात आलेल्या ‘फिट इंडिया फ्रीडम रन’ मध्ये जळगावकरांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.

          स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त फिट इंडिया फ्रीडम रन 2.0 चे आयोजन करण्यात आले होते. या रन ची सुरूवात पोलीस कवायत मैदान येथून करण्यात आली. पोवाडा सादरीकरणनंतर दौड सुरू झाली. याप्रसंगी खा.उन्मेष पाटील, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, महानगरपालिका आयुक्त सतिष कुलकर्णी, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित, राष्ट्रीय सेवा योजनेचे नोडल अधिकारी दिनेश पाटील, रेडक्रॉस सोसायटीचे गनी मेमन, विनोद बियाणी, नेहरू युवा केंद्राचे युवा अधिकारी नरेंद्र डागर आदी उपस्थित होते.

          दौडच्या उदघाटनप्रसंगी खा.उन्मेष पाटील म्हणाले की, युवा पिढीचे तन, मन सदृढ राहण्याच्यादृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फिट इंडिया उपक्रम हाती घेतला आहे. युवक देशाचा आधारस्तंभ असून उद्याचा सदृढ भारत निर्माण व्हावा, यासाठी आज तरुणांनी शरीर स्वास्थाचे महत्व ओळखावे. देशभरात साडेसात कोटी युवक आज या अभियानात सहभागी होत आहेत. तन, मन सदृढ ठेवण्यासाठी ‘फिट इंडिया फ्रीडम रन’ मध्ये सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

          जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी, शरीर सदृढ राखण्याच्या दृष्टीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरुण पिढीत जर आरोग्य सुदृढतेची जागरूकता झाल्यास देशाची संविधानिक मूल्ये जपण्यास देखील मदत होईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

          पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे म्हणाले की, भारतीयांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता वाढावी. प्रत्येकाने सुदृढ आणि तंदुरुस्त राहण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. स्वतःसाठी, देशासाठी फिट राहण्यासाठी धावणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

          महानगरपालिका आयुक्त सतिष कुलकर्णी म्हणाले की, आजची तरुणपिढी व्याधीमुक्त राहण्यासाठी अशा दौडचे आयोजन महत्वपूर्ण असून प्रत्येकाने या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.

          नेहरु युवा केंद्राचे युवा अधिकारी नरेंद्र डागर यांनी प्रस्ताविकात नेहरू युवा केंद्राची माहिती विशद केले तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा करताना फिट फॉर फ्रीडमचेही महती सांगितली.

          पोलीस कवायत मैदानावर मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून दौडला सुरुवात झाली. शिवतीर्थ मैदान, गोविंदा रिक्षा स्टॉप, नेहरू चौक मार्गे पुन्हा पोलीस कवायत मैदानावर शेवट करण्यात आला. दौडच्या उद्घाटनप्रसंगी विनोद ढगे यांच्या पथकाने पोवाडा सादर केला. ‘फिट इंडिया’ची शपथ दिल्यानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अगोदर नोंदणी करून निवडकच विद्यार्थ्यांना या दौडमध्ये प्रवेश देण्यात आला होता.

          कार्यक्रमासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी, नेहरू युवा केंद्राचे अजिंक्य गवळी, युवक प्रतिनिधी तेजस पाटील, आकाश धनगर, चेतन वाणी, भूषण लाडवंजारी, दीपक सपकाळे, शाहरुख पिंजारी, रोहन अवचारे आदींसह सर्व स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. या दौडमध्ये बेंडाळे महाविद्यालय, एसएनडीटी महिला महाविद्यालय, मू.जे.महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला.

बातमी लाईक  करा,शेअर करा

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!