आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
आरोग्य व शिक्षण
Trending

लालबाग राजा गणेश मंडळा तर्फे राबविले कोविड१९ लसीकरन शिबिर

पाचोरा – आज दि.१८ सप्टे. रोजी पाचोरा शहरात बाजोरिया नगर ,लालबाग राजा गणेश मंडळा तर्फे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवस सप्ताहाच्या निमित्ताने कोरोना लसीकरन शिबिर राबविण्यात आले.कोरोनामुक्त भारत करण्याचे उद्दिष्ट साधण्यासाठी संपुर्ण देशात महालसीकरन शिबिरं घेण्यात येत आहे.यावेळी सदर लसीकरना साठी गर्दी बघावयास मिळाली शहरातील विविध कॉलनी भागातील गरजुंनी सदर लसीकरना लाभ घेतला.लालबाग राजा गणेश मंडळाचे राहुल नरेंद्र जैन यांचा आज वाढ दिवस असल्याने दुग्धशर्करा योग जुळुन आला. शिबिरासाठी आपल्या  सहकांर्या सोबत त्यांनी प्रयत्न करून हे कार्य संपन्न केले.

.

या शिबीरासाठी अचूक नियोजन केल्याचे दिसून आले,आलेल्या नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी त्यांचे नाव ऑनलाईन नोंदणी करुण देणे व कोविड १९ लसीचा पहिला व दुसरा डोस मिळने पर्यंत नोंदी करणे हे सर्व काम बूथ वरील उपस्थित सहकारी यांनी बघितले,अमित वाणी यांनी आपले तांत्रिक कौशल्य वापरीत येथे मदत केली

भाजप तालुका अध्यक्ष श्री अमोलभाऊ शिंदे यांनी सदर शिबीर स्थळी येऊन पाहणी केली प्रसंगी येथील मंडळातील कार्यकरर्त्यांनी स्वागत केले यावेळी विघ्नहर्ता चरणी कोरोनामुक्त देश होणे साठी प्रार्थना केली तसेच त्यांनी नागरिकांशी ही सवांद साधला.

सदर शिबीरात साधारण अंदाजित  ५००पेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरन झाल्याचे आयोजकांन कडून सांगण्यात आले.

लोकांन कडून स्वयमस्फुर्तीने प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले शिवाय नागरिकांच्या मदतीसाठी ईतर उपस्थित तरुण मंडळीने सहकार्य केले विशेष म्हणजे सुनील गौड हे तरुण तडफदार झुंजार व्यक्तिमत्व या वेळी मदत करताना दिसून आले प्रवीण दायमा,संकेत तांबोली,सागर तांबोली,रोहन पाटील,हेमंत जैन ,प्रिंस जैन,नरेश सिनकर,शुभम बोरसे भोला संजय पाटील,नामदेव जाधव यांचेही मदत कार्य शिबीराचे यशस्वीतेसठी उपयोगी ठरले.नागरिकांन कडून देखील आयोजकांचे कौतुक होउन आभार प्रकटण होतांना दिसले.

सालाबाद प्रमाने येथे गणेशोत्सवावेळी सामाजीक व पर्यावरणात्माक प्रबोधनपर उपक्रम राबविले जात असतात परंतु कोरोना महामारीने मागील दिड –पावनेदोन वर्षापासून जे जागतीक संकट निर्माण झाले आहे त्यामुळेराजकीय,सामाजीक,आर्थिक,व्यापार, वैद्यकीय आदी क्षेत्रात सर्वत्र बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.तसेच कोविड १९ मुळे मोठ्या प्रमाणात जिवीत व आर्थिक हानी झालेली आहे अशा वेळेला सदर कोविड १९ लसीकरनाचे शिबिर घेउन मंडळाने आपले सामाजिक दायित्व जोपासल्याचे दिसते.     

आरोग्य विभागातील महिला कर्मचारी भारती पाटील ,कल्पना पाटील,राजश्री पाटील व सह्कर्यांनी  तालुका वैद्यकीय अधिकारी समाधान वाघ यांचे मार्गदर्शनाखाली अचूक नियोजन करून कोविड १९ लसीकरन केले व औषधी गोळया दिल्या,त्यांचेही काम कौतुकास्पद आहे.

.

बातमी लाईक  करा,शेअर करा

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!