वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि अजंता फार्माकडून मुख्यमंत्री सहायता निधीला मदत; धनादेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपुर्द
मुंबई: मोफत कोविड लसीकरणासाठी वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि अजंता फार्माकडून मुख्यमंत्री सहायता निधी (कोविड-19) साठी प्रत्येकी 1 कोटी रुपयांची मदत देण्यात आली. धनादेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे वर्ल्ड ट्रेड सेंटरचे चेअरमन विजय कलंत्री आणि अजंता फार्माचे व्हाईस चेअरमन मधुसुदन अग्रवाल यांनी वर्षा निवासस्थान येथे सुपुर्द केला.
यावेळी उद्योग मंत्री सुभाष देसाई, मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल, वर्ल्ड ट्रेड सेंटर चे व्हाईस चेअरमन शरद उपासणी आणि अजय रुईया तसेच अजंता फार्मा चे व्यवस्थापकीय संचालक योगेश अग्रवाल उपस्थित होते.
राज्यात सुरु असलेल्या कोविड लसीकरण मोहिमेला बळ देण्यासाठी वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या एमव्हीआयआरडी सेंटर मार्फत 1 कोटी आणि अजंता फार्माच्या वतीने 1 कोटी इतका निधीचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-१९ साठी देण्यात आला आहे.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377