पाचोरा –पाचोरा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पाचोरा तालुक्यातील १२७ गावे डार्क झोन मधुन वगळणे बाबत निदर्शनास आणुन, मागील ४ वर्षापासुन पाचोरा तालुक्यातील १२७ गावे हे डार्क झोन मध्ये असल्याकारणाने अहिल्याबाई सिंचन विहीर योजना (मनरेगा), डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबी योजना तथा बीरसा मुंडा येजना या इत्यादी योजनेमध्ये महाराष्ट्र शासन १०० टक्के अनुदान देत असते. परंतू पाचोरा तालुका डार्क झोन मध्ये असल्या कारणाने पाचोरा तालुक्यातील जनता ह्या सर्व शासकीय योजनेच्या लाभापासून वंचित राहत असल्या कारणाने पाचोरा तालुका डार्क झोन मधुन उठवुन जनतेस वरील योजनांचा लाभ द्यावा.हि विनंती करण्यात आली.
पाचोरा पंचायत समिती अंतर्गत विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी होणे बाबत
१) १५वा वित्त आयोगाच्या निधी खर्च करण्याची प्रक्रिया सुटसुटीत व्हावी. तसेच PFMS प्रणाली रद्द
व्हावी.
२) मनरेगा योजनेत पाचोरा पंचायत समिती मध्ये ३ वर्षापासुन वैयक्तीक लाभाचे गोठाशेड, सिंचन विहीरी
तथा शेत शिवार रस्त्याचे प्रस्ताव पडुन आहेत. गरजु व योग्य लाभार्थ्यांना तात्काळ लाभ द्यावा.
३) सन २०१८ ते सन २०२१ पर्यंतचे प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना आणि शबरी
आवास योजना यांचे घरकुल प्रस्ताव प्रलंबीत असल्या कारणाने सदरच्या लाभार्थ्यांना अनुदान तात्काळ
अदा करुन नविन लाभार्थ्यांना लाभ मिळुन देण्यास प्रयत्नशिल असावे.
४) पंचायत समिती पाचोरा यांच्या स्थरावर नागरीकांच्या विविध तक्रारी, समस्या ह्या प्रलंबीत असुन ते
तात्काळ मार्गी लागावी यासाठी यंत्रणा उभारावी. असे निवेदन देण्यात आले
पाचोरा तालुक्यातील अनेक गावे पोखरा योजनेच्या बाहेर असुन त्या गावांवरती अन्याय झाल्याचे भावना तेथील जनतेच्या असल्या कारणाने आम्ही आपणास विनंती करतो की,उर्वरीत सर्व गावांचा समावेश पोखरा योजने अंतर्गत करावा व त्यांना पोखरा योजनेचा लाभा तात्काळ देण्यात यावा.पाचोरा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने उपरोक्त मागण्या निदर्शनास आणुन देत त्या लवकर पूर्ण होणे साठी विकास संतोष पाटील सर ,नंगरसेवक पाचोरा नगर परिषद,१) श्री. रणजित पाटील, प्रशासक मार्केट कमिटी २) श्री. अभिजित पवार, युवक तालुका अध्यक्ष. ३) कु. पंकज गढरी, युवक जिल्हा उपाध्यक्ष ४) श्री. विलास पाटील, उपसरपंच नगरदेवळा ,विलास राजार पदिल ५) श्री. सुनिल तावडे, शहर अध्यक्ष नगरदेवळा. यानी विनंती केली
.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377