जिल्हास्तरीय नारीशक्ती सन्मान पुरस्कारासाठी सोनाली दारकोंडे यांची निवड
जळगाव – जळगाव जिल्हा शारीरिक शिक्षण क्रीडा शिक्षक महासंघ यांनी जळगांव जिल्हातील तालुका स्थरातून सर्वोत्तम महिला जिल्हास्तरीय क्रीडाशिक्षिका नारीशक्ती सन्मान पुरस्कारसाठी जयकिरण प्रभाजी न्यू इंग्लिश मेडिअम स्कूल पाचोरा च्या क्रीडा शिक्षिका सोनाली सुभाष दारकोंडे (तांदळे) यांची निवड झाली आहे.त्यांना हा पुरस्कार दि.10ऑक्टोबर रोजी जळगांव येथे प्रदान करण्यात येणार आहे.
क्रीडा क्षेत्रात खेळाडू कसे घडवायचे व उत्तम संघ खेळाडू घडवण्यासाठी विशेषता मुली ना खेळा मध्ये त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना प्रोत्साहित करून खेळाचे महत्व पटवून देऊन खेळण्यासाठी मैदानात जिद्दीने कस खेळायचं व जीवनात पण कठीण प्रसंग अडचणी आल्यास कसा सामना करायचा हे पटवून दिले. शालेय स्पर्धा मुलींच्या vollyball संघास तालुका स्थरीय सामन्या मध्ये फायनल विजेता पद जिंकवून दिले. व जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये सुद्धा विशेष प्राविण्य सेमिफायनल पर्यंत विजय मिळवून दिला होता.
ह्या सर्व चांगल्या कामगिरीची दखल घेऊन जळगाव जिल्हा शारीरिक शिक्षण क्रीडा शिक्षक महासंघ यांनी हा पुरस्कार सोनाली सुभाष दारकोंडे (तांदळे) मॅडम यांना हा पुरस्कार जाहीर केला आहे.
ह्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री.दिनेशजी बोथरा, उपाध्यक्ष श्री गिरीशजी कुलकर्णी, सचिव श्री जीवनजी जैन, क्रीडा समन्वयक प्रा गिरीष पाटील ,स्कूल कमिटी चेअरमन श्री लालचंद केसवाणी, स्कूल कमिटी सचिव श्री रितेशजी ललवाणी व सर्व संचालक मंडळ सीईओ अतुल चित्ते प्राचार्य पुष्पा पाटील मॅडम व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377