एव्हिएशन लीडर इंडियन ऑइलकडून सिंधुदुर्ग विमानतळाच्या उद्घाटनाच्या दिवशी पहिल्या उड्डानासाठी इंधन पुरवठा
सिंधुदुर्ग दि.९- महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग येथील या ग्रीनफिल्ड विमानतळाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने इंडियन ऑइल एव्हिएशन कडून आज सिंधुदुर्ग विमानतळावर अलायन्स एअरच्या पहिल्या उड्डाणाला इंधन पुरविण्यात आले. भारत सरकार ने UDAAN या योजनेंतर्गत सिंधुदुर्ग विमानतळाला (प्रादेशिक कनेक्टिव्हिटी योजना) आरसीएस विमानतळ म्हणून अधिसूचित केले आहे.
आरसीएस विमानतळ असल्याने या विमानतळावर इंधन भरण्यासाठी व्यवस्था करण्यासाठी भारत सरकार तर्फे इंडियनऑइलला वाटप करण्यात आले आहे. यानंतर सर्व अनुसूचित आणि बिगर अनुसूचित विमान कंपन्यां करीता इंधन व्यवस्थेसाठी इंडियनऑईलच्या एव्हिएशन विंगद्वारे सिंधुदुर्ग विमानतळावर अत्याधुनिक इंधन पुरविण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. कोविड महामारी असूनही, सर्व कोविड मार्गदर्शक तत्त्वे आणि प्रोटोकॉलचे पालन करुन, सिंधुदुर्ग विमानतळावरील नवीन एव्हिएशन फ्यूलिंग स्टेशन (एएफएस) चे बांधकाम करण्यात आले आणि सिंधुदुर्ग विमानतळावर इंधन सुविधा वेळेवर पूर्ण होण्यासाठी पूर्ण व्यवस्था केली गेली. इंधन सुविधा पुरविण्याची पुर्णव्यवस्था करण्यात आली. सिंधुदुर्ग विमानतळावर इंधन सुविधेची व्यवस्था करण्यात आल्यामुळे गंतव्यस्थानासह चार्टर व पर्यटक उड्डाणे या ठिकाणी थेट उतरू व जाऊ शकतात.
पुढे हे नवीन विमानतळ कार्यरत झाल्यानंतर, चार्टर आणि कार्गो उड्डाणे देखील कार्यान्वीत होऊ शकतील. इंडियनऑईल कडून चार्टर आणि कार्गोच्या उड्डाणासाठी आवश्यक सर्व इंधनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
विमानचालन क्षेत्रात इंडियनऑईलने आपले नेतृत्व स्थान कायम ठेवले आहे. सिंधुदुर्ग एव्हिएशन इंधन स्टेशन सुरू झाल्यामुळे इंडियनऑईलने देशात निर्माण केलेल्या एकूण एएफएस ची संख्या 124 इतकी होईल. आरसीएस अंतर्गत इंडियनऑइल कडून देशातील 42 विमानतळांवर एएफएस कार्यरत आहेत.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377