कॉग्रेस जळगाव जिल्हाअध्यपदी प्रदीप पवार : फटाक्यांची आतषबाजी

जळगाव :- भारतीय राष्ट्रीय काँग्रेस च्या जळगाव जिल्हाध्यक्ष पदी प्रदीप पवार यांची निवड झाली असून या निवडीबद्दल भडगाव शहरात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. तर जळगाव मुख्यालयात ढोल-ताशे लावण्यात आले.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जळगाव जिल्हाध्यक्ष पदावर प्रदीप पवार यांची निवड करण्यात आली असून या निवडीचे पत्र आज दि. ७ अॉक्टोंबर रोजी दिल्ली येथुन राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मान्यता देऊन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी नियुक्ती चे पत्र पाठवले आहे. या निवडी बद्दल भडगाव शहरात फटाक्यांची आतषबाजी सेवादल जिल्हाध्यक्ष संजय पाटील सह पाचोरा तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, शहर अध्यक्ष अॅड अमजद पठाण, माजी पंचायत समिती सभापती इस्माईल शेख फकीरा, सरचिटणीस प्रताप पाटील, अल्पसंख्याक जिल्हा सचिव इरफान मनियार, शहर उपाध्यक्ष गणेश पाटील, सोशल मीडिया तालुका अध्यक्ष कल्पेश येवले, भडगाव शहर अध्यक्ष दिलीप शेंडे, उपाध्यक्ष रतीलाल महाजन, अल्पसंख्याक उपाध्यक्ष याकुब पठाण, तालुका अध्यक्ष कमरअली पटवे, आदी उपस्थित होते. जळगाव शहरातील कॉंग्रेस मुख्यालयात ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष करण्यात आला आहे
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377



