
जळगाव, दि.1: ‘सर्वासाठी घरे’ या केंद्र सरकारच्या धोरणांतर्गत 31 मार्च, 2022 पर्यंत राज्य शासनामार्फत राज्यातील सर्व घरकुल योजनांची प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘महाआवास अभियान- ग्रामीण’ राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या अनुषंगाने जळगाव जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांबाबतची सविस्तर माहिती देण्यासाठी शुक्रवार 3 डिसेबर, 2021 रोजी सकाळी 11 वाजता ऑनलाइन जिल्हास्तरीय कार्यशाळा जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे.
जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील हे या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी असतील, असे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालकांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे

बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377



