सकल बौद्ध समाजातर्फे सोमवारी पाचोऱ्यात नवनिर्वाचित नगराध्यक्षांसह नगरसेवकांच्या सत्काराचे आयोजन

पाचोरा दि.25 :- पाचोरा शहर व तालुक्यातील सकल बौद्ध समाज बांधव व समाजातील विविध संस्था संघटनांकडून प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत पाचोरा नगरपालिकेत निवडून आलेल्या लोकनियुक्त नगराध्यक्षासह शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांचा सत्काराचे आयोजन सोमवारी दि.२६ रोजी सायंकाळी ५ वाजता शहरातील जनता वसाहत भागातील धम्म ध्वजाजवळ करण्यात आले असून तमाम नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन बौद्ध समाज बांधवांचा वतीने करण्यात आले आहे.

नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून सुनीता किशोर आप्पा पाटील यांच्यासह अठ्ठावीस नगरसेवक भरघोस मतांनी विजयी झाले आहेत. त्यामुळे सामाजिक बांधीलकी जपत सकल बौद्ध समाजाच्या वतीने त्यांच्या सत्काराचे नियोजन करण्यात आले आहे.सदर
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाचोरा भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर आप्पा पाटील हे राहणार असून सर्व नवनिर्वाचित नगरसेवक तसेच भारतीय बौद्ध महासभेसह विविध सामाजिक संघटनांचे व मंडळाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
तरी पाचोरा तालुक्यातील समस्त बौद्ध बांधवांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी असे आवाहन सकल बौद्ध समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



