पाचोरा: – तालुक्यातील गिरणाई शिक्षण संस्थेच्या शिंदे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी अँड रिसर्च पाचोरा महाविद्यालयात दि. 25 सप्टेंबर रोजी जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.शिंदे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, पाचोरा तर्फे जागतिक फार्मसिस्ट दिनानिमित्त फार्मसिस्ट जनजागृती रॅली, वृक्षारोपण, ई-पोस्टर स्पर्धा असे विविध कार्यक्रम साजरा करण्यात आले.कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष श्री पंडितराव परशुराम शिंदे तसेच शिंदे इंटरनॅशनल स्कूल चे प्राचार्य डॉ. विजय पाटील उपस्थीत होते. फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोज पाटील यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे नियोजन प्राचार्य डॉ. मनोज पाटील, प्रा.जयश्री बोरसे, प्रा. उज्वल महाजन यांनी केले. यशस्वितेसाठी समाधान बोरसे प्रतीक्षा गोरे मनीषा चव्हाण प्रफुल्ल शिंदे यांचे सहकार्य लाभले.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377